पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज लोणावळ्यामध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यादरम्यान बोलताना शरद पवारांनी मावळचे आमदार सुनिल शेळके यांना खडेबोल सुनावले आहेत. तसेच ‘तू आमदार कुणामुळे झालास, त्या अर्जावर सही कोणाची, कसा आमदार झालास, तुला सोडणार नाही’, असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या या वक्तव्यावर आता उपुमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना राजकारणात जवळपास ५५ वर्षे पुर्ण झालीत. या स्तराच्या नेत्याने एका आमदाराला अशा प्रकराच्या धमक्या देणं योग्य नाही. मी त्यांना सल्ला देण्याएवढा मोठा नाही पण त्यांनी याचा पुर्नविचार करावा. शेवटी ते कुठल्या स्तराला आहे आणि जर अशा प्रकारे ते आमदारांना धमक्या द्यायला लागले तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांचा जो स्तर आहे तो खाली येईल. मला वाटत नाही की कोणी आमदार त्यांना किंवा त्यांच्या (शरद पवारांच्या) कार्यकर्त्यांना कोणी धमकी देत असेल. मी काही त्यांचं म्हणणं ऐकलेलं नाही तुम्हा पत्रकारांकडून जी माहिती मिळाली त्या आधारावरच मी प्रतिक्रिया देतोय, पण मला हे योग्य वाटत नाही, असे फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, ‘शरद पवारांबाबत आजही आम्हाला श्रद्धा आहे. त्यांनी माझ्या संदर्भात असं वक्तव्य का केलं?, या संदर्भात मला कल्पना नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी अजित पवारांबरोबर खंबीर पणे उभा राहणार आहे. भविष्यातदेखील असणार आहे. मात्र साहेब किंवा त्यांच्या बरोबर असलेले नेते माझ्या मतदार संघात येऊन वक्तव्य करत आहेत. मी कोणाला दम दिला, माझ्या वाटेला कोणी जाऊ नका, असं सांगितलं त्यांच्याकडून जात आहे. मला त्यांनी त्या कार्यकर्त्यांचा फोन नंबर द्या मी दिलगिरी व्यक्त करेन’, असं आमदार सुनील शेळके म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे मतदारसंघात ओबीसींची संख्या जास्त; राजकीय समीकरणं बदलणार!
-आयटी कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेची महत्वाची घोषणा; भाडेतत्त्वाने घर देण्याचा प्रकल्प उभारणार
-‘त्यांच्याबद्दल आजही आदरच, पण…’; शरद पवारांच्या टीकेला सुनील शेळकेंचं उत्तर
-‘सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्यांनी….’; संजोग वाघेरे आणि श्रीरंग बारणेंच्यात जुंपली
-मला शरद पवार म्हणतात, माझ्या वाट्याला गेलात तर….; शरद पवारांचा सुनील शेळकेंना सज्जड इशारा