पुणे : आगामी लोकसभा तोंडावर आली आहे. पुणे शहर लोकसभा मतदारसंघात ओबीसी आणि अन्य मतदारांची संख्या आता सर्वाधिक होत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात याआधी सवर्ण मतदारांची संख्या सर्वाधित असायची. ओबीसी आणि अन्य उर्वरित मतदारांची संख्या ७ लाख १२ हजार ९८० आहे. म्हणजेच ही आकडेवारी ३५.५९ टक्के असल्याचं एका आकडेवारीतून समोर आलं आहे.
येत्या निवडणुकीत सवर्ण मतदारांच्या एकूण ३१.४२ टक्क्यांपेक्षा ४ टक्के अधिक असलेली ओबीसी आणि अन्य मतदारांची संख्या ही भविष्यातील राजकारणात प्रभाव पाडणारी ठरु शकते. जातीपातीवरुन निर्णय घेणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांना नव्याने समीकरणं मांडावी लागणार आहेत.
माळी, धनगर, वंजारी (माधव),सह नाभिक, लिंगायत, साळी, गवळी, आदी ३८० समाज घटकांचा समावेश ओबीसी मतदारांमध्ये होतो. या आकडेवारीनुसार ब्राह्मण मतदारांपेक्षा मुस्लिम मतदार हे १ लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. अनुचूचित जातीच्या म्हणजे बौद्ध, महार मतदारांचे एकत्रित प्रमाणही ब्राह्मण मतदारांएवढेच झाले आहे.
पुणे शहरात एकूण २० लाख ३ हजार ३१६ मतदार आहेत. मराठा मतदारांचे प्रमाण ३ लाख ५७ हजार ५९२ म्हणजेच १७. ८५ टक्के आहेत. त्यानंतर मुस्लिम मतदार २ लाख ८९ हजार ०७८ म्हणजेच १४.४२ टक्के आहेत. आणि ब्राह्मण मतदारांची संख्या तब्बल २ लाख ७१ हजार ८५० म्हणजेच १३.५७ टक्के एवढी आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आयटी कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेची महत्वाची घोषणा; भाडेतत्त्वाने घर देण्याचा प्रकल्प उभारणार
-‘त्यांच्याबद्दल आजही आदरच, पण…’; शरद पवारांच्या टीकेला सुनील शेळकेंचं उत्तर
-‘सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्यांनी….’; संजोग वाघेरे आणि श्रीरंग बारणेंच्यात जुंपली
-मला शरद पवार म्हणतात, माझ्या वाट्याला गेलात तर….; शरद पवारांचा सुनील शेळकेंना सज्जड इशारा
-‘भाजप हे वॉशिंग मशीन, आरोप करा अन् पक्षात प्रवेश देऊन धुवून काढा’; शरद पवारांची जहरी टीका