पुणे : पुणे महापालिकेचे २०२४-२५ या अर्थिक वर्षासाठी महापालिकेचे ११ हजार ६०० कोटींचे बजेट पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सादर केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे बजेट २ हजार कोटींनी अधिक आहे. आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणारे हे बजेट ठरले आहे. पुण्यात येणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांची आता गोड बातमी आहे.
पुण्यात येणाऱ्या आयटी कर्मचारी काही ठराविक कालावधीसाठी पुण्यातील आयटी कंपन्यांमध्ये जॉबसाठी येतात. मात्र, या ठिकाणी घराचे भाडे वाढीव दराने असल्याने बहुतांश लोकांना भाड्याने घर मिळवणे अवघड जाते. अशा कर्मचाऱ्यांना घरांचा लाभ घेता यावा म्हणून पालिकेने महत्वाची घोषणा केली आहे.
बाणेर परिसरामध्ये आयुक्तांनी भाडेतत्वावर घर देण्याचा प्रकल्प उभारणार असल्याची मोठी घोषणा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केली आहे. पुणे बाणेर भागातील आयटी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार असून हे कर्मचारी या प्रकल्पातून उभारलेल्या घरांचा लाभ घेऊ शकतात.
पुणे महापालिका प्रशासनाने अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ केली नाही. त्यामुळे सलग आठव्या वर्षी पुणेकरांवर कोणतीही करवाढ असणार नाही. बजेटच्या माध्यमातून आयुक्त विक्रम कुमार यांनी भाडेतत्त्वावरील घरांबाबत एक मोठी घोषणा केली आहे. महापालिका बाणेर परिसरामध्ये मोठ मोठ्या इमारती उभारून त्यामधील घरे भाडेतत्त्वावरती देणार आहे.
पुणे शहरामध्ये नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने येणाऱ्या लोकांना परवडणाऱ्या दरामध्ये घरे उपलब्ध व्हावीत, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या घरांचा उपयोग प्रामुख्याने बाणेर, हिंजवडी परिसरामध्ये आयटी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. या भागातील आयटी कर्मचारी काही ठराविक कालावधीसाठी पुण्यातील आयटी कंपन्यांमध्ये जॉबसाठी येतात. मात्र, या ठिकाणी घराचे भाडे वाढीव दराने असल्याने बहुतांश लोकांना भाड्याने घर मिळवणे अवघड जाते. अशा कर्मचाऱ्यांना या घरांचा लाभ होणार आहे, असं विक्रम कुमार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘त्यांच्याबद्दल आजही आदरच, पण…’; शरद पवारांच्या टीकेला सुनील शेळकेंचं उत्तर
-‘सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्यांनी….’; संजोग वाघेरे आणि श्रीरंग बारणेंच्यात जुंपली
-मला शरद पवार म्हणतात, माझ्या वाट्याला गेलात तर….; शरद पवारांचा सुनील शेळकेंना सज्जड इशारा
-‘भाजप हे वॉशिंग मशीन, आरोप करा अन् पक्षात प्रवेश देऊन धुवून काढा’; शरद पवारांची जहरी टीका
-अजित पवारांना मोठा धक्का; ‘वेळ पण तीच मालक पण तोच’, म्हणत पदाधिकाऱ्यांसह १३७ जणांचा राजीनामा