पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज लोणावळ्यामध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यादरम्यान बोलताना शरद पवारांनी मावळचे आमदार सुनिल शेळके यांना खडेबोल सुनावले आहेत. तसेच ‘तू आमदार कुणामुळे झालास, त्या अर्जावर सही कोणाची, कसा आमदार झालास, तुला सोडणार नाही’, असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या या वक्तव्यावर आता सुनील शेळके यांनी उत्तर दिलं आहे.
‘शरद पवारांचा आम्हाला आदर आहे. पण आम्ही कायम अजित पवारांच्या पाठिशी राहणार आहोत. पद आणि राजकीय कारकिर्द आम्ही डोळ्यासमोर ठेवून राजकीय काम करत नाही. त्यामुळे शरद पवारांनी हे वक्तव्य का केलं?, याचा मी नक्की विचार करेन’, असं सुनील शेळके म्हणाले आहेत.
‘शरद पवारांबाबत आजही आम्हाला श्रद्धा आहे. त्यांनी माझ्या संदर्भात असं वक्तव्य का केलं?, या संदर्भात मला कल्पना नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी अजित पवारांबरोबर खंबीर पणे उभा राहणार आहे. भविष्यातदेखील असणार आहे. मात्र साहेब किंवा त्यांच्या बरोबर असलेले नेते माझ्या मतदार संघात येऊन वक्तव्य करत आहेत. मी कोणाला दम दिला, माझ्या वाटेला कोणी जाऊ नका, असं सांगितलं त्यांच्याकडून जात आहे. मला त्यांनी त्या कार्यकर्त्यांचा फोन नंबर द्या मी दिलगिरी व्यक्त करेन’, असं सुनील शेळके म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्यांनी….’; संजोग वाघेरे आणि श्रीरंग बारणेंच्यात जुंपली
-मला शरद पवार म्हणतात, माझ्या वाट्याला गेलात तर….; शरद पवारांचा सुनील शेळकेंना सज्जड इशारा
-‘भाजप हे वॉशिंग मशीन, आरोप करा अन् पक्षात प्रवेश देऊन धुवून काढा’; शरद पवारांची जहरी टीका
-अजित पवारांना मोठा धक्का; ‘वेळ पण तीच मालक पण तोच’, म्हणत पदाधिकाऱ्यांसह १३७ जणांचा राजीनामा
-स्वकियांना चिंता की विरोधकांना धास्ती! मोहोळांविरोधात ‘तो’ बॅनर नेमका लावला कोणी?