पुणे : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना अनेक पक्षांची उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. बारणे आणि वाघेरे यांच्यात तुफान खडाजंगी सुरु आहे.
‘संजोग वाघेरे यांच्यावर मी बोलणार नाही. त्यांचा मतदारसंघात थांग पत्ता नाही. त्यांच्यावर काय बोलू’, असं म्हणत श्रीरंग बारणे यांनी टीका केली होती. बारणे यांच्या टीकेवर संजोग वाघेरे यांनी पलटवार केल्याचं पहायला मिळत आहे. संजोग वाघेरेंनी पिंपरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना बारणेंवर सडकून टीका केली आहे.
‘श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत. ते जर मतदारसंघातील नागरिकांना ओळखत नसतील तर ही शोकांतिका आहे. त्यांना समजलं पाहिजे की ते कुणाबद्दल बोलत आहेत. कारण मी त्यांच्या मतदारसंघात राहतो. माझं मूळ गाव, जन्मभूमी आणि कर्मभूमी ही पिंपरी गाव आहे. ते चुकीचं बोलत आहेत. ते कुठल्या पक्षातून कुठल्या पक्षात आले आहेत, हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी सत्तेसाठी पक्ष सोडला. आम्ही तत्वांसाठी पक्ष सोडला. आम्ही सत्तेसाठी दुसऱ्या पक्षात गेलो नाहीत’, असं संजोग वाघेरे म्हणााले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-मला शरद पवार म्हणतात, माझ्या वाट्याला गेलात तर….; शरद पवारांचा सुनील शेळकेंना सज्जड इशारा
-‘भाजप हे वॉशिंग मशीन, आरोप करा अन् पक्षात प्रवेश देऊन धुवून काढा’; शरद पवारांची जहरी टीका
-अजित पवारांना मोठा धक्का; ‘वेळ पण तीच मालक पण तोच’, म्हणत पदाधिकाऱ्यांसह १३७ जणांचा राजीनामा
-स्वकियांना चिंता की विरोधकांना धास्ती! मोहोळांविरोधात ‘तो’ बॅनर नेमका लावला कोणी?
-‘भाजप भ्रष्ट जुमला पक्ष, निवडणूक जिंकण्यासाठी ते कोणत्याही थराला जातील’; सुप्रिया सुळेंची जहरी टीका