पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्व पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत शरद पवार गटात पुन्हा वापस जाण्याचा निर्णय घेतला आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांसह १३७ जणांनी राजीनामा दिल्याने अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार हे राज्यात विविध ठिकाणी कार्यकर्ता मेळावा घेत आहेत. आजही लोणावळ्यात शरद पवारांच्या उपस्थितीत अजित पवार गटाच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह १३७ शरद पवार गटात जाणार आहेत.
या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शरद पवारांनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत. ‘भाजप म्हणजे वॉशिंग मशीन, आरोप करा आणि पक्षात प्रवेश देऊन धुवून काढा, भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे’, अशा शब्दांत शरद पवारांनी भाजपवर तोंडसुख घेतलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांना मोठा धक्का; ‘वेळ पण तीच मालक पण तोच’, म्हणत पदाधिकाऱ्यांसह १३७ जणांचा राजीनामा
-स्वकियांना चिंता की विरोधकांना धास्ती! मोहोळांविरोधात ‘तो’ बॅनर नेमका लावला कोणी?
-‘भाजप भ्रष्ट जुमला पक्ष, निवडणूक जिंकण्यासाठी ते कोणत्याही थराला जातील’; सुप्रिया सुळेंची जहरी टीका
-‘ज्या २२ आमदारांचा उल्लेख केला त्यातली २ तरी जाहीर करा’; सुनिल शेळकेंचे रोहित पवारांना आव्हान
-महापालिका उपअभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये नोटांचे बंडल; कारवाई होण्याआधीच रोख रकमेसह फरार