पुणे : आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस मोठी फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसाठी महत्वाची लढाई म्हणजे बारामती लोकसभा निवडणुकीची लढाई. या निवडणुकीत बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.
अजित पवारांकडून अद्याप अधिकृत उमेदवारी घोषित केली नसली तरीही बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी प्रचाराला सुरवात केली आहे. शहरात प्रचारच्या विकास रथ फिरताना दिसत आहेत. अशातच आता सुनेत्रा पवार यांनी आज इंदापूर तालुक्याच्या गावभेट दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना सूचक वक्तव्य केलं आहे.
‘बारामतीचा उमेदवार म्हणून माझे नाव’
‘तुम्ही संधी दिली तर तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही दोघेही प्रयत्न करू, असे मी आश्वासन देते. कारण, कालच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जर बारामतीचा उमेदवार आमचा असेल तर माझे नाव घेतले आहे. म्हणून मी हे आज पहिल्यांदाच बोलत आहे. मी कालपर्यंत हे बोलत नव्हते. जनतेने अगोदरच माझी उमेदवारी जाहीर केली असली तरी मी पहिल्यांदा असे बोलत आहे’, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.
‘दादांनी शेवटच्या माणसांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला’
‘एवढ्या मोठ्या सगळ्या कामांमध्ये कमी-जास्त कुठे तरी राहते. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली कामे मी पाहते तेव्हा मला अभिमान वाटतो. लोकांच्या प्रतिक्रियेवरुन जाणवतं, दादांनी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. इथून पुढे सुद्धा तुमच्या अडचणी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न होईल अशी खात्री देते’, असं आश्वासन सुनेत्रा पवारांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे काँग्रेमध्ये “लेटर बॉम्ब”चा झटका, लोकसभा उमेदवारीवरून आबा बागुलांचा इच्छुकांना दणका
-जानकर शरद पवारांच्या साथीला?; पवारांनी जानकरांसाठी सोडली माढाची जागा
-आढळराव पाटलांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा विरोध; म्हणाले, ‘आयात…’
-‘येत्या काळात ठाकरे-मोदी एकत्र येणार’; शहाजी बापू पाटलांनी वर्तवलं भाकित