पुणे : राज्यात लोकसभेची सर्व राजकीय पक्षांची तयारी सुरु आहे. मात्र शिरुरच्या जागेबाबत महायुतीत आणखी संभ्रम कायम आहे. शिरुरच्या जागेबाबत महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक झाली.
शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याच्या विचारात आहेत. आढळराव पाटलांना सेनेकडून उमेदवारी न देता त्यांना म्हडाचे अध्यक्षपद देऊन त्यांचा पत्ता कट केला. त्यानंतर आढळराव पाटील हे अजित पवारांसोबत जाण्याच्या तयारीत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव यांना घेण्यास विरोध करण्यात आला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आयात उमेदवार नको. विलास लांडे यांना शिरुरमध्ये उमेदवारी द्यावी. आयात उमेदवाराच्या चर्चेमुळे पक्षाची प्रतिमा खराब होत आहे’, असे मत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मांडलं आहे.
‘बारामती लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळेंच्या विरोधात लवकर उमेदवार जाहीर करावा. सुप्रिया सुळे या बारामतीमध्ये प्रचाराला लागल्या आहेत. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात यावी’, हे महत्वाचे मुद्दे कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘येत्या काळात ठाकरे-मोदी एकत्र येणार’; शहाजी बापू पाटलांनी वर्तवलं भाकित
-पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम; वाहतूक नियमात बदल करुनही ट्रफिकच
-‘दादांनी आधी पुरंदर विधानसभेचा मला शब्द द्यावा’; विजय शिवतारेंची जाहीर मागणी
-भाजपचं ठरलंय! पुण्यात मुरलीधर मोहोळ लोकसभेचे उमेदवार?
-धक्कादायक! ड्रग्ज प्रकरणी अटक केलेल्या उपनिरीक्षकाकडून आणखी २ किलो ड्रग्ज जप्त