पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीची सर्व राजकीय पक्ष तयारी करत आहेत. काही उमेदवारांनी आपल्या प्रचारालीही सुरवात केली आहे. या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी विरोधकांमध्ये टीका-टिपण्णी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यातच आता शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. शहाजी पाटील यांनी ठाकरे गट आणि भाजपबाबत भाकीत वर्तवलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
“एक हजार टक्के पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत. माझा अंदाज कधीही चुकणार नाही. निवडणूक ही तुमच्या ५ वर्षांच्या कामावर आणि कष्टावर चाललेली असते. कोणत्याही निवडणुकीत शेवटचे २ दिवस सर्वात महत्त्वाचे असतात. या २ दिवसांचा अंदाज निवडणूक सर्व्हे करणाऱ्यांनाही येत नाही. नुकत्याच झालेल्या मध्यप्रदेश, राजस्थान विधानसभेचा निवडणूक सर्वे चुकला. सर्व्हे त्याचबरोबर बीआरएस बाबत तेलंगणातील सर्व्हे देखील चुकला होता. त्यामुळे सर्व्हेवर विश्वास किती ठेवायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते, असे शहाजी बापू पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि भाजप यांची महायुती तुटल्यापासून सेना-भाजप नेत्यांनी एकमेकांवर टीका-टिपण्णी करताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात सरकार स्थापन केल्यानंतरही ठाकरे गटाने शिंदे तसेच भाजपने शिवसेना फोडल्याचा आरोप करत भाजपवर ताशेरे ओढले होते. त्यातच आता शिंदे गटाच्या आमदाराने केलेल्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शहाजी बापू पाटील यांच्या या वक्तव्याला भाजप आणि शिंदे गटाकडून दुजोरा मिळालेला नाही.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम; वाहतूक नियमात बदल करुनही ट्रफिकच
-‘दादांनी आधी पुरंदर विधानसभेचा मला शब्द द्यावा’; विजय शिवतारेंची जाहीर मागणी
-भाजपचं ठरलंय! पुण्यात मुरलीधर मोहोळ लोकसभेचे उमेदवार?
-धक्कादायक! ड्रग्ज प्रकरणी अटक केलेल्या उपनिरीक्षकाकडून आणखी २ किलो ड्रग्ज जप्त
-‘तुम्हाला कोणी धमकावलं तर मला सांगा, पुढचं मी बघतो’; काकाविरोधात पुतण्याने दंड थोपटले