पुणे : पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा विचार करता पुणे वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून अवजड वाहनांची पुणे शहरात एन्ट्री बंद केली आहे. न्यायालयाच्या आदेशावरुन वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूकीबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.
शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पोलीस आयुक्तांसह संपूर्ण पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरलेली पहायला मिळाली आहे. शहरात सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या भागात ही योजना वाहतूकीचे नियमात बदल केले गेले आहेत. पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक वळून वाहनचालकांना दिलासा देण्याची योजना आखली गेली आणि शहरात येणाऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी किंवा याला आळा घालण्यासाठी शहरात वाहतूक बदल केले असूनही ट्रफिकचा प्रश्न अद्यापही सुटलेला दिसत नाही. वाहनचालकांना या ट्रफिकच्या समस्येला सामोर जावंच लागत आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीचे हे उपाय तात्पुरते आहेत, याचे भान ठेवून दीर्घकालीन उपायांचा विचार होण्यासाठी महानगरपालिका, पोलीस खाते आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांनी एकत्रितपणे या सर्व बाबींचा विचार करण्याची गरज आहे.
ऑफिसच्या वेळेमध्ये शहरातील बहुतेक रस्ते वाहनांनी गच्च भरलेले असतात. नेमक्या गर्दीच्या, वाहतूक कोंडीच्या वेळीच संबंधिक रस्त्यांवर वाहतूक पोलीस आणि सिंग्नलस् नसतात. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकांना अशा भागातून प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत वाटते. परिणामी ट्रफिक जास्तच वाढताना दिसते.
महत्वाच्या बातम्या-
-‘दादांनी आधी पुरंदर विधानसभेचा मला शब्द द्यावा’; विजय शिवतारेंची जाहीर मागणी
-भाजपचं ठरलंय! पुण्यात मुरलीधर मोहोळ लोकसभेचे उमेदवार?
-धक्कादायक! ड्रग्ज प्रकरणी अटक केलेल्या उपनिरीक्षकाकडून आणखी २ किलो ड्रग्ज जप्त
-‘तुम्हाला कोणी धमकावलं तर मला सांगा, पुढचं मी बघतो’; काकाविरोधात पुतण्याने दंड थोपटले