पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. मावळ मतदारसंघात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांंनी प्रचाराला सुरवात देखील केली आहे. महायुतीकडून संजोग वाघेरे यांच्या विरोधात कोण निवडणुकीच्या मैदानात उतरणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.
‘गेली १० वर्षे झाली मावळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा होता. आगामी निवडणुकीत देखील त्या ठिकाणी गद्दारांचा पराभव करून पुन्हा शिवसेनेचा खासदार मी होईल’, अशी आशा संजोग वाघेरे यांनी व्यक्त केली आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आपणच निवडणून येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
मावळ मतदारसंघात महायुतीकडून अद्यापही उमेदवार ठरलेला नाही. मात्र, महायुतीचा उमेदवार हा कमळाच्या चिन्हावर लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच, मावळ लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या नावावर अद्याप तरी शिक्कामोर्तब झालेलं नाही. त्यांची देखील उमेदवारीवरून धाकधूक वाढली आहे.
“उद्धव ठाकरे यांनी उरणच्या सभेत उमेदवारी जाहीर केली. मावळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा राहिलेला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा खासदार म्हणून मी निवडून येईल, अशी मला खात्री आहे”, असं संजोग वाघेरे म्हणाले आहेत.
“विरोधक कमळाच्या चिन्हावर लढल्यास उलट निवडणूक सोपी होईल. कारण भाजपच्या विरोधात सुप्त लाट आहे. याचा फायदा मला होईल. मतदान करताना ते शिवसेनेला करतील. महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला गेल्याने नागरिक नाराज आहेत. महागाईने नागरिक त्रस्त आहेत”, असे वाघेरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-कसब्यात “होय हे आम्ही केलं”चा पॅटर्न; निवडणूक लोकसभेची पण कसब्यात चर्चा ‘पोस्टर वॉर’ची
-“राष्ट्रवादीत फूट नाही आणि पवार कुटुंबातही फूट नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ
-“अमोल कोल्हे फिल्मी डायलॉगबाजी करणारे खासदार! धाकल्या धन्याचं नाव घेवून पैसे कमावतात”
-‘या निवडणुकीनंतर अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटात येणार’; रोहित पवारांचा विश्वास