पुणे : राज्याच्या राजकारणाची समीकरणं वारंवार बदलत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलीय हे स्पष्ट आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच ‘आपण आपले काका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून वेगळं झालो आहोत’, असं स्पष्ट केलं आहे. अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटातील वाद सर्वोच्च न्यायालयातही गेला. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात अजित पवार यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला. अजित पवार यांच्या गटाला खरा पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. तसेच पक्षाचं घड्याळ चिन्हंदेखील अजित पवार यांच्या गटाला मिळालं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून दोन गट झाल्याचं स्पष् दिसत असताना शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवा ट्विस्ट आला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट नाही आणि पवार कुटुंबातही फूट नाही. आमच्या कुटुंबात जे काही होतं त्याला प्रायव्हसीचा अधिकार आहे. मला, शरद पवार, रोहित पवारांना तो अधिकार नाही, पण आमच्या उर्वरित कुटुंबियांना प्रायव्हसीचा अधिकार आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबात, कौटुंबिक वेळात ज्या काही गोष्टी होतात त्या अर्थातच सांगता येणार नाहीत. आता तुम्ही तुमच्या बायकोशी काय बोलता हे थोडी मला सांगणार आहात”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
“एक तर मी लोकशाहीत काम करते. मी माझे वैयक्तिक संबंध कधीच लपवलेले नाहीत. माझे वैयक्तिक संबंध सगळ्याच पक्षाच्या लोकांसोबत असतात. कारण मी लोकशाहीवर विश्वास ठेवणारी आहे. त्यामुळे माझे सगळ्यांची राजकीय आणि वैचारीक मतभेद आहेत. माझे कुणाशीही मनभेद नाहीत. लोकशाही आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असतो. प्रत्येकाची एक स्टाईल आहे. पक्षामध्ये फूट पडलेली नाहीच. शिवाय पवार कुटुंबात तर अजिबात फूट पडलेली नाही”, असं सुप्रिया सुळे स्पष्ट म्हणाल्या आहेत.
अजित पवारांनी पक्षफूटीबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना, “कुणी कसं वागावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. ते मी कसं सांगणार? पण एक गोष्ट मला सांगाविशी वाटते की, ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत चर्चा झाली पाहिजे. आपण आपलं प्रोफेशनल आणि प्रायव्हेट आयुष्य मिक्स करु शकत नाही. तेवढी वैचारिक प्रगल्भता आपल्यात आलेली पाहिजे”, असं मत सुप्रिया सुळे यांनी मांडलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“अमोल कोल्हे फिल्मी डायलॉगबाजी करणारे खासदार! धाकल्या धन्याचं नाव घेवून पैसे कमावतात”
-‘या निवडणुकीनंतर अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटात येणार’; रोहित पवारांचा विश्वास
-आढळराव राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत; अजित पवारांनी टाळला नामोल्लेख
-“ज्यांच्या नाकाखालून सहकारी निघून गेले त्यांची बरोबरी मोदी, शहांसोबत काय करणार?”
-“घरात लग्नला विभक्त कुटुंबही एकत्र येत, देशात लोकसभा नावाचं लग्न…”- चंद्रकांत पाटील