पुणे : राज्यातत लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णी करताना पहायला मिळत आहे. राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणारा मतदारसंघांपैकी एक म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून खासदार अमोल कोल्हे हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. यावरुन आता शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे माजी खासदार शिवजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.
‘अमोल कोल्हे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी त्या खासदारांचे नाव जाहीर करावं’, असं खुलं आव्हान शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटलांनी दिलं आहे. “अमोल कोल्हे हे फिल्मी डायलॉग बाजी करणारे खासदार आहेत. ते फक्त धाकल्या धन्याच नाव घेवून पैसे कमावतात. हे त्यांना शोभत नाही! छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे आमच्या जिव्हाळ्याचे आहेत. ते आमचे आदरस्थान आहेत. पण अमोल कोल्हे तुम्ही उगाच बोलून व्यापारासाठी, धंद्यासाठी निवडणुकीसाठी उपयोग करू नका”, असं म्हणत शिवाजी आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना खोचक टोला लगावला आहे.
‘स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसाठी अमोल कोल्हे यांनी अनेकांचे उंबरे झिजवले. पण त्यावेळच्या एका खासदाराने मला सांगितलं की काहीही केलं तरी पैसे फिटणार नाहीत’, असं सांगितलं, असं वक्तव्य अमोल कोल्हे वारंवार करताना दिसतात. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना महायुतीकडून कोल्हे यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या आढळराव यांनी हे खुलं आव्हान दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘या निवडणुकीनंतर अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटात येणार’; रोहित पवारांचा विश्वास
-आढळराव राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत; अजित पवारांनी टाळला नामोल्लेख
-“ज्यांच्या नाकाखालून सहकारी निघून गेले त्यांची बरोबरी मोदी, शहांसोबत काय करणार?”
-“घरात लग्नला विभक्त कुटुंबही एकत्र येत, देशात लोकसभा नावाचं लग्न…”- चंद्रकांत पाटील
-अजितदादा, ही अप्रत्यक्ष कबुली तर नाही ना?; अमोल कोल्हेंचं ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर