पुणे : लोकसभेच्या निवडणुकांची पूर्व तयारी सुरू झाली आहे. कोणत्याही क्षणी निवडणूक घोषित होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या बारामती, पुणे व शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या क्लस्टरचे प्रमुख आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या तीनही लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यानतंर पाटील यांनी पत्रकाराशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
‘कोण किती वाजता उठतं हे सर्वांना माहिती आहे. ते आमदारांना तर भेटत पण नव्हते. त्यांना आता पर्याय नाही, म्हणून ते घराबाहेर पडू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व ठिकाणी जातात. रात्रीची बैठक संपून पुन्हा ते दुसऱ्या दिवशी ३ देश फिरुन आले. त्यांची तुलना घरातून बाहेर न पडणाऱ्यांशी होणार नाही’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
‘ज्यांच्या नाकाखालून त्यांचे सहकारी निघून गेले, त्यांची मोदी आणि आमित शहा यांच्याशी काय बरोबरी करणार?’, असा प्रश्न उपस्थित करुन उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे यांच्यावर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे.
‘पुणे, शिरूर, बारामती लोकसभा मतदारसंघाची चांगली बैठक झाली. त्यामध्ये विशेष असे काही सांगण्यासारखे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला प्रत्येक बूथवर इतर मतांपेक्षा अधिक ३७० मतांचे टार्गेट दिले आहे. त्यानुसार काम केले जाणार आहे’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“घरात लग्नला विभक्त कुटुंबही एकत्र येत, देशात लोकसभा नावाचं लग्न…”- चंद्रकांत पाटील
-अजितदादा, ही अप्रत्यक्ष कबुली तर नाही ना?; अमोल कोल्हेंचं ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर
-मित्राला खासदार करायचंय! मुरलीधर मोहोळांनी अनुभवला ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’
-हर्षवर्धन पाटलांनी केला धमकीचा आरोप; राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता करणार गैरसमज दूर
-“बरेच जण म्हणतात हे परत एकत्र येतील की काय? अरे बाबांनो आता…”; अजित पवार स्पष्टच सांगितलं