पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे पुन्हा रिंगणात उतरण्याची चर्चा आहे, तर महायुतीकडून अद्यापही उमेदवार कोण? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुरमध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवारांच्या टीकेला आता अमोल कोल्हेंनी उत्तर दिलं आहे.
“शिरुरमध्ये सेलिब्रिटींना उमेदवारी देऊन चूक केली. जेव्हा उमेदवार मिळत नाही तेव्हा आम्ही सेलिब्रिटींना उमेदवारी देतो’ अजित पवारांच्या या वक्तव्याला अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“अजित दादांनी ज्या सर्वांची उदाहरणं दिली यातील एकाही सेलिब्रेटी झालेल्या खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचं माझ्या ऐकण्यात नाही आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने त्यांचे प्रश्न मांडत असताना पहिल्या टर्ममध्ये तब्बल तीन वेळा संसद रत्न पुरस्कार मला मिळालेला आहे”, असं सांगत अमोल कोल्हेंनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
“राहता राहिला प्रश्न मी राजीनामा देण्याचं आपल्याकडे बोलून दाखवलं असं आपण वारंवार सांगतात परंतु जर मी राजीनामा द्यायच्या विचारात होतो तर मी संसदेत अनुपस्थित होतो का? मी संसदेत बोलणं सोडून दिलं होतं का? मी संसदेत प्रश्न मांडणं सोडून दिलं होतं का? जर आपण सगळा लेखाजोखा बघितला तर हे आवर्जून नमूद करेन की आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत हे सुद्धा संसदेमध्ये रायगड लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात आणि आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या संसदीय कामगिरीपेक्षाही आपण सेलिब्रिटी म्हणून हिनवता पण माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका मध्यमवर्गीय व्यक्तीची संसदीय कामगिरी ही आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा उजवी आहे. तेही आपण रेकॉर्ड तपासून पाहू शकता”, असंही अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
माझं प्रतिउत्तर…#AjitPawar #AmolKolhe #Shirur #ShirurLokSabhaConstituency@NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @RRPSpeaks @AshokPawarMLA @Devdattanikam @TV9Marathi @SakalMediaNews @abpmajhatv @mataonline @SaamanaOnline @SarkarnamaNews @thodkyaat… pic.twitter.com/7rIWtenANR
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) March 4, 2024
“अभिनेता धर्मेंद्र, गोविंदा निवडणुकीला उभे राहतात, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा उभे राहतात, यांचा राजकारणाशी काय संबंध? या नटनट्यांचं राजकारणात काय काम? अमिताभ बच्चनदेखील निवडणुकीला उभे राहिले आणि निवडून आले. नंतर त्यांना वाटलं, हे राजकारण आपलं काम नाही आणि त्यांनी राजीनामा दिला. सगळं सोडून दिलं. शेवटी त्यांना त्या भागातली विकासाची कामं करायची आवड आहे का हे महत्त्वाचं असतं”, असं अजित पवार शिरुरमधील शेतकरी मेळाव्यात म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-मित्राला खासदार करायचंय! मुरलीधर मोहोळांनी अनुभवला ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’
-हर्षवर्धन पाटलांनी केला धमकीचा आरोप; राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता करणार गैरसमज दूर
-“बरेच जण म्हणतात हे परत एकत्र येतील की काय? अरे बाबांनो आता…”; अजित पवार स्पष्टच सांगितलं
-“मी छाती ठोकपणे सांगतो, जानकर कुठेही जाणार नाहीत”; चंद्रकांत पाटलांचा विश्वास
-‘नट-नट्यांचं राजकारणात काय काम?’; अजित पवारांनी उडवली अमोल कोल्हेंची खिल्ली