पुणे : राज्याच्या राजकारणातील समीकरणं घडीघडीला बदलत असतात. राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यातच सत्तेत असलेल्या महायुतीमध्ये पूर्वी कट्टर विरोधक असलेले नेते, मंत्री आता सोबत आहेत. युतीत असूनही त्या पक्षांतील नेत्यांमध्ये खटके उडताना दिसत आहेत.
लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना इंदापुरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांमधील संघर्ष शिगेला पोहचला आहे. माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राष्ट्रवादीचे नेते धमकी देत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
‘मित्रपक्षातील लोक जाहीर भाषणात धमकावत असल्याने आम्ही मतदारसंघात फिरायचे की नाही? जर उद्या काही झाले तर त्याला जबाबदार कोण? असे सवालही हर्षवर्धन पाटलांनी पत्राद्वारे उपस्थित केले आहेत.
हर्षवर्धन पाटलांच्या या पत्रानंतर इंदापूरसह पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत ‘हर्षवर्धन पाटलांचा गैरसमज झाला असून, त्यांच्याशी चर्चा करणारआहे’, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले आहे.
“हा महायुतीच्या अंतर्गत घटक पक्षांचा विषय आहे. आम्ही त्यांच्याशी भेटून चर्चा करणार आहोत. त्यांचे समज-गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. इंदापूरमध्ये यापूर्वी कधीही अशाप्रकारे धमकी देण्याचे राजकारण झालेले नाही. हर्षवर्धन पाटलांना कोणी धमकी देईल असे वाटत नाही. मात्र, त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर कोणाच्या वक्तव्यामुळे त्यांना असे वाटले याची स्पष्टता येईल”, असे मतही गारटकरांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“बरेच जण म्हणतात हे परत एकत्र येतील की काय? अरे बाबांनो आता…”; अजित पवार स्पष्टच सांगितलं
-“मी छाती ठोकपणे सांगतो, जानकर कुठेही जाणार नाहीत”; चंद्रकांत पाटलांचा विश्वास
-‘नट-नट्यांचं राजकारणात काय काम?’; अजित पवारांनी उडवली अमोल कोल्हेंची खिल्ली
-कोथरुडमध्ये श्रमिकांसाठी मोफत ‘प्रेमाची न्याहारी’ उपक्रम; चंद्रकांत पाटलांनीही घेतला आस्वाद
-अजितदादांच्या स्वागताला हजेरी ते गाडीतून प्रवास, आढळराव पाटलांचं पक्क ठरलंय?