पुणे : आज महायुतीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्याशी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामती पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर हे बैठकीला न बोलवण्याने नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यावर आता चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महादेव जानकर यांनी महायुतीच्या बैठकांना पदाधिकाऱ्यांनी हजर राहू नये, असे आवाहन करण्यात केले आहे. त्यामुळे ते अन्य पक्षाबरोबर जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “महादेव जानकर हे महायुतीबरोबर असून मी छाती ठोकपणे सांगतो की, ते कुठेच जाणार नाही.”
“देवेंद्र फडणवीस हे त्यांचे परममित्र आहेत. तर पंकजा ताई या त्यांच्या बहीण आहेत. त्यामुळे हे दोघेही महादेव जानकर यांच्या मनातील जे काही प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी समर्थ आहेत. माझे एकदा समाधान होऊ द्या आणि मग मला बैठकीला बोलवा. अशी भूमिका त्यांनी (महादेव जानकर) मांडली आहे. त्यांचे हे म्हणणे ठीक आहे. ते कुठेही गेले नाही आणि जाणारदेखील नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
आज पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित आहेत. बैठकीपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘नट-नट्यांचं राजकारणात काय काम?’; अजित पवारांनी उडवली अमोल कोल्हेंची खिल्ली
-कोथरुडमध्ये श्रमिकांसाठी मोफत ‘प्रेमाची न्याहारी’ उपक्रम; चंद्रकांत पाटलांनीही घेतला आस्वाद
-अजितदादांच्या स्वागताला हजेरी ते गाडीतून प्रवास, आढळराव पाटलांचं पक्क ठरलंय?
-महायुतीत मतभेद; चंद्रकांत पाटलांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना
-“मला काय माहीत हा दिवटा असा उजेड पाडेल”; अजित पवारांनी उडवली अशोक पवारांची खिल्ली