पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्व पक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील हे बारामती, शिरुर आणि पुणे या मतदारसंघांचा पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काही घटक पक्षांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. बारामती लोकसभेच्या बैठकीतील महत्वाची बातमी आता समोर आली आहे.
हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे, विजय शिवतारे विरुद्ध राष्ट्रवादी, राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात, या सर्व महायुतीच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यामध्ये आपापसाद मतभेद आहेत. याच कार्यकर्त्यांमधील मतभेद मिटवण्यासाठी मुंबईत बैठक महायुतीने महत्वाची बैठक बोलवली आहे. महायुतीमध्ये स्थानिक वाद मिटवण्यासाठी मुंबई येथे महत्वाची बैठक घेण्यात आली आहे.
पुणे येथे पत्रकारांशी संवाद .. pic.twitter.com/HkgaVh7SEs
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) March 4, 2024
आज या बैठकीमध्ये चंद्रकांत पाटलांनी पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. ‘तालुका स्तरावर समन्वय ठेवा आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करा’, अशा चंद्रकांत पाटलांनी दिल्या आहेत. यावरुन आता महायुतीमधील स्थानिक मतभेद कधी दूर होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या मतभेदाचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“मला काय माहीत हा दिवटा असा उजेड पाडेल”; अजित पवारांनी उडवली अशोक पवारांची खिल्ली
-पुण्यात महायुतीची महत्वाची आढावा बैठक; खोत, जानकरांना निमंत्रण नाही
-समाविष्ट गावांची थकबाकी वसुली थांबवा; पालकमंत्री अजित पवारांनी दिले आयुक्तांना आदेश
-पुण्यात येणाऱ्या जड वाहनांना ‘नो एन्ट्री’; वाहतूक पोलिसांचा महत्वाचा निर्यण