पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या आधीच आमदार अशोक पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडली आहे. अजित पवारांनी आज अशोक पवारांचा समाचार घेतला.
घोडगंगा कारखाना चालवायला जमत नसेल तर नवीन संचालक मंडळ आणू किंवा प्रशासकाची नेमणूक करू, शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून लवकरच घोडगंगा कारखाना संकटातून बाहेर काढणार, असे म्हणत अशोक पवार वेडवाकडं चालत असल्याची टीका अजित पवारांनी केली आहे. अजित पवार हे शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
“तुमच्या आमदाराने खासगी कारखाना व्यवस्थित चालवला, पण तुमच्या हक्काच्या कारखान्याची माती केली. तुम्ही म्हणाल, आता काय बोलताय, आधी मतं तुम्हीच द्यायला लावली. अरे हो की बाबा झाली चूक, मला काय माहीत हा दिवटा असा उजेड पाडेल,” अशा शब्दांत शेतकऱ्यांशी संवाद साधताना अजितदादांनी अशोक पवारांची खिल्ली उठवली आहे.
“शिरूर विधानसभेचे आमदार अशोक पवारांनी घोडगंगा कारखान्यावर मुलाला चेअरमन केलं. मी आमदारांना म्हटलं तो नवखा आहे. पण आमदार काय ऐकायला तयार नाही. पुढं काय झालं, कारखाना बंद पडायची अवस्था निर्माण झाली,” अशी आठवण अजित पवारांनी अशोक पवारांना करून दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात महायुतीची महत्वाची आढावा बैठक; खोत, जानकरांना निमंत्रण नाही
-समाविष्ट गावांची थकबाकी वसुली थांबवा; पालकमंत्री अजित पवारांनी दिले आयुक्तांना आदेश
-पुण्यात येणाऱ्या जड वाहनांना ‘नो एन्ट्री’; वाहतूक पोलिसांचा महत्वाचा निर्यण
-ड्रग्ज रॅकेट: पुणे पोलिसांकडून विश्रांतवाडीत एमडीसाठी लागणारा ३६० किलो कच्चा माल जप्त