पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्व पक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील हे बारामती, शिरुर आणि पुणे या मतदारसंघांचा पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काहीच घटक पक्षांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
महायुतीच्या या महत्वाच्या बैठकीला घटक पक्षातील महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याने अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. महायुतीच्या समन्वयकांची ही बैठक आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आले आहे.
दरम्यान, घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सदाभाऊ खोत आणि महादेव जानकर यांना या बैठकीचे निमंत्रण न आल्याने त्याचा नाराजीचा सुर दिसून आला आहे. यावरुन भाजपला आता घटक पक्षांची गरज नाही का? असा प्रश्न विचारला जात आहे. राष्ट्रीय समाज पक्ष आणि रयत क्रांती संघटना हे घटक पक्ष जरी लहान असले तरीही सदाभाऊ खोत आणि महादेव जानकर हे भाजपसाठी तसेच महायुतीसाठी महत्वाचे नेते आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-समाविष्ट गावांची थकबाकी वसुली थांबवा; पालकमंत्री अजित पवारांनी दिले आयुक्तांना आदेश
-पुण्यात येणाऱ्या जड वाहनांना ‘नो एन्ट्री’; वाहतूक पोलिसांचा महत्वाचा निर्यण
-ड्रग्ज रॅकेट: पुणे पोलिसांकडून विश्रांतवाडीत एमडीसाठी लागणारा ३६० किलो कच्चा माल जप्त
-“अजितदादा हळूच मला गृहखातं मागतील पण मी ते माझ्याकडेच ठेवणार”; फडणवीसांचा मिश्किल टोला