पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच राज्यातील महत्वाच्या लोकसभा मतदारसंघापैकी एक म्हणजे शिरुर लोकसभा मतदारसंघ आहे. शिरुर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र महायुतीकडून अद्यापही उमेदवार कोण? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. तर दुसरीकडे उमेदवारांची अदलाबदल केली जाणार असल्याची चर्चाही रंगत आहे.
अशातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज अमोल कोल्हेंच्या होमपीचवर सभा घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज शिरुरमध्ये शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. आजच्या या सभेत अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवार हे अजित पवारांच्या निशाण होते. “अशोक पवारांना मीच आमदार असताना मदत केली आहे. त्यांना कधीही अगदी रात्री १२ ला उठवून विचारलं तरीही ते सांगतील हो दादांनीच मदत केली.” असं अजित पवार म्हणाले आहेत.
🔰04-03-2024 🛣️ शिरूर, जि. पुणे
⏱️ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित शेतकरी मेळावा | Live
https://t.co/SzriHKSyxM— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 4, 2024
“यापुढेही मी तुम्हाला मदत करत राहील. सुदैवाने अर्थमंत्रालय आपल्याकडे आहे. तुम्ही एकाजीवीशी जशी मला १९९१ साली साथ दिली तशीच साथ तुम्ही सातत्याने देत आला आहात. तशीच साथ द्या.”, असं आवाहन अजित पवार म्हणाले आहेत.
शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मंचरमधील सभेनंतर आज अजित पवारांची सभा घेतली आहे. या सभेत अजित पवारांनी अमोल कोल्हे, अशोक पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-समाविष्ट गावांची थकबाकी वसुली थांबवा; पालकमंत्री अजित पवारांनी दिले आयुक्तांना आदेश
-पुण्यात येणाऱ्या जड वाहनांना ‘नो एन्ट्री’; वाहतूक पोलिसांचा महत्वाचा निर्यण
-ड्रग्ज रॅकेट: पुणे पोलिसांकडून विश्रांतवाडीत एमडीसाठी लागणारा ३६० किलो कच्चा माल जप्त
-“अजितदादा हळूच मला गृहखातं मागतील पण मी ते माझ्याकडेच ठेवणार”; फडणवीसांचा मिश्किल टोला
-“छत्रपती संभाजी महाराज एकही ‘निवडणूक’ हरले नव्हते”; अजित पवारांकडून भाषणात झाली चूक