पुणे : राज्य शासनाच्या वतीने बारामतीमध्ये आज ‘नमो महारोजगार मेळावा’ आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यसभा खासदार शरद पवार, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांसह इतर नेते मंडळी उपस्थित होते.
यावेळी विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटन करण्यात आलं. अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं तोंडभरुन कौतुक केले आहे.
“या इमारती बघून लोक माझ्यामागे लागतील की, मला बारामतीलाच पोस्टिंग द्या. अजितदादांनी स्वतः लक्ष घालून चांगल्या इमारती बांधल्या आहेत. आपल्या पोलिस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत त्यांचं पीएमसी (प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट) म्हणून तुम्हालाच नियुक्त करावं, असा मला मोह होतोय. परंतु दादा मला हळूच म्हणतील पीएमसी कशाला खातंच (गृहखातं) मला द्या. परंतु मी ते देणार नाही. खातं माझ्याकडेच ठेवेन मात्र तुमची मदत चांगल्या इमारती बांधण्यासाठी घेईन”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना मिश्किल टोला लगावला आहे.
🕐 1.05pm | 2-3-2024 📍 Baramati, Pune | दु. १.०५ वा. | २-३-२०२४ 📍 बारामती, पुणे.
LIVE | NaMo MahaRojgar Melava, Baramati#Maharashtra #ITI #नमोमहारोजगारमेळावा #NaMoMahaRojgarMelava https://t.co/5NTUjaXMyU
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 2, 2024
“आजच्या रोजगार मेळाव्यात ५५ हजार पदं अधिसूचित करण्यात आलेली आहेत. तरुणांना रोजगार हवा आणि दुसरीकडे रोजगार देणारे आहेत. अजित पवारांनी पुढाकार घेऊन पश्चिम महाराष्ट्रात रोजगाराची संधी दिलेली आहे. आम्ही राजकारणात काम करणारे लोक कंत्राटी कामगार आहोत. दर ५ वर्षांनी आमचं कंत्राट रिन्यूव्ह होतं. चांगलं काम केलं नाही तर लोकं घरी बसवतात. आम्ही आता तरुणांसाठी चांगलंच काम उभं केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला नक्कीच जनतेचा आशीर्वाद मिळेल. पहिल्यांदाच असं झालंय की, ५५ हजार पदं आहेत आणि अर्ज कमी आले आहेत. उद्या आणखी अर्ज येतील”, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“छत्रपती संभाजी महाराज एकही ‘निवडणूक’ हरले नव्हते”; अजित पवारांकडून भाषणात झाली चूक
-कसबा गणपती मंदिरात जाताना ‘या’ गोष्टी लक्षात घ्याच; पाळावे लागणार आहेत नियम
-ड्रग्ज प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटक; ४५ कोटी रुपयांचे एमडी जप्त
-मुख्यमंत्र्यांसह फडणवीस अन् अजितदादा स्टेजवर, शरद पवार बोलायला उठताच बारामतीकरांचा जल्लोष
-सुप्रिया सुळे, शरद पवार मंचावर असताना मुख्यमंत्री म्हणाले, “आमचं सरकार राजकारण विरहित”