पुणे : राज्य शासनाच्या वतीने बारामतीमध्ये आज ‘नमो महारोजगार मेळावा’ आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यसभा खासदार शरद पवार, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांसह इतर नेते मंडळी उपस्थित होते.
‘नमो महारोजगार मेळावा’ या कार्यक्रमाच्या निमित्त भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील नेतेमंडळी एकाच मंचावर असताना शरद पवार हे बोलण्यासाठी उठताच बारामतीकरांनी मोठा जल्लोष केल्याचं चित्र पहायला मिळालं. याबाबतचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे.
पहा व्हिडीओ-
हे प्रेम आहे बारामतीकरांचं. कुणी कितीही सत्तेचा खटाटोप केला तरी, निष्ठावंत बारामतीकरांचं प्रेम हे बारामतीचं ज्यांनी भलं केलं त्या आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांवरच आहे, हेच आजच्या कार्यक्रमातून पुन्हा एकदा स्पष्ट झालं. pic.twitter.com/3rOxbGFlXu
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) March 2, 2024
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामतीकरांचा कल नेमका कोणाकडे आहे? हे येत्या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून दिसून येईलच. मात्र आजच्या कार्यक्रमातून बारामतीकरांचं प्रेम हे शरद पवारांप्रती असल्याचं चित्र दिसून येत आहे. याबाबत शरद पवार गटाकडून व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सुप्रिया सुळे, शरद पवार मंचावर असताना मुख्यमंत्री म्हणाले, “आमचं सरकार राजकारण विरहित”
-“तरुणांना रोजगाराची गरज, राजकारण सोडून एकत्र यावं”; ‘नमो महारोजगार मेळव्या’त शरद पवारांचं वक्तव्य
-शिरुर लोकसभेत आयात केलेल्यांना उमेदवारी देणार असाल तर….; विलास लांडेंचा अजितदादांना इशारा
-Pune Metro | पुणेकरांसाठी मेट्रोचा नवा मार्ग होणार खुला; मोदींच्या हस्ते लोकर्पण