पुणे : पुणे शहरातील मेट्रो स्टेशनपैकी काही मेट्रो मार्गांचे उद्घाटन रखडून होते. पुणे शहरातील रुबी हॉल ते रामवाडी मार्गिकेचं काम पूर्ण होऊनही अनेक कारणांमुळे या मेट्रो मार्गाचं उद्घाटन रखडलं होतं. त्यातच सगळी मार्गिका तयार असूनही मेट्रो मार्ग का सुरु करत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर पुणे मेट्रोच्या नव्या मार्गीकेच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त लागला आहे. ६ मार्च रोजी पुण्यातील नव्या मेट्रोमार्गाचे उद्घाटन होणार आहे. पुणे शहरातील रुबी हॉल ते रामवाडी मार्गीकेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहे.
नव्या ५.५ किलोमीटरच्या मार्गीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून नवा मार्ग तयार होऊन देखील उद्घाटन अभावी मेट्रो धावू शकली नव्हती. पण पंतप्रधान कार्यालयाकडून ६ मार्चचा मुहूर्त मिळाल्याने कोलकत्ता येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन स्वरूपात नव्या मेट्रोमार्गेचे उद्घाटन करणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ड्रग्ज प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाचा हात??? चौकशी सुरु
-पिंपरी चिंचवड पोलिसांकडून २ कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त
-पुण्यात पाणी कपात; बुधवारी शहरातील ‘या’ परिसरातील पाणी पुरवठा राहणार बंद
-मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर फडणवीस म्हणाले,”मी अधिकृतपणे सांगतो की एकनाथ शिंदे…”
-“मी लोकसभेची तयारी करतोय, पण…” मुरलीधर मोहोळांनी अखेर लोकसभेचे पत्ते उघडले, नेमकं काय म्हणाले वाचा