पुणे : पुणे शहरात ड्रग्ज प्रकरणाला काही पुर्णविराम लागेना. शहरात सर्वात मोठ्या प्रमाणात तब्बल कोट्यावधींचा ड्रग्ज साठा सापडत आहे. त्यातच आता पिंपरी चिंचवड परिसरातून २ किलो २० ग्रॅम तब्बल २ कोटी २ लाख रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त केला आहे.
विक्रीच्या प्रयत्नांत असलेले २ कोटी रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स पकडले आहेत. ही कारवाई शुक्रवारी (१ मार्च) पहाटे साडे ४ वाजताच्या सुमारास पिंपळे निलख येथे सांगवी पोलिसांकडून करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पकडण्याच्या घटना समोर येत असतानाच पिंपरी चिंचवड पोलिसांनी देखील मोठी कारवाई केली आहे.
नमामी शंकर झा (वय ३२, रा. निगडी. मूळ रा. बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विजय मोरे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपळे निलख येथे रक्षक चौकाजवळ एक व्यक्ती एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून नमामी झा या आरोपीला ताब्यात घेतले आहे. हे ड्रग्ज आरोपीने विक्रीसाठी आणले असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात पाणी कपात; बुधवारी शहरातील ‘या’ परिसरातील पाणी पुरवठा राहणार बंद
-मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर फडणवीस म्हणाले,”मी अधिकृतपणे सांगतो की एकनाथ शिंदे…”
-“मी लोकसभेची तयारी करतोय, पण…” मुरलीधर मोहोळांनी अखेर लोकसभेचे पत्ते उघडले, नेमकं काय म्हणाले वाचा
-फडणवीसांनी शरद पवारांचं जेवणाचं आमंत्रण नाकारलं; म्हणाले, ‘आग्रही निमंत्रणाला..’