पुणे : राज्य शासनाच्या वतीने बारामतीमध्ये ‘नमो महारोजगार मेळावा’ आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष राज्यसभा खासदार शरद पवार यांनी भोजनाचे आमंत्रण दिले होते. मात्र व्यस्त असल्याचं कारण देते देवेंद्र फडणवीसांनी हे आमंत्रण नाकारले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक पत्रही शरद पवारांना लिहून त्यांचे आभारही मानले आहेत. बारामतीमध्ये ‘नमो महारोजगार मेळाव्या’च्या कार्यक्रमासाठी आलेल्या अतिथींना बारामतीमध्ये शरद पवारांचे निवासस्थान असल्याने शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण दिलं आहे. मात्र ‘व्यस्त कार्यक्रमांमुळे आपण या जेवणासाठी हजर राहू शकणार नाही’ असं देवेंद्र फडणवीसांनी नम्रपणे सांगितलं आहे.
फडणवीसांचं शरद पवारांना पत्र
आपले पत्र मिळाले. भोजनासाठी आपण निमंत्रित केल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आपण जाणताच की, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. बारामतीतील भरगच्च कार्यक्रम लक्षात घेता आणि तदनंतर वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांचे भूमिपूजन, त्यानंतर लगेचच आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन असे आणखी दोन मोठे कार्यक्रम लागोपाठ असल्याने उद्याचा संपूर्ण दिवस अत्यंत व्यस्ततेचा असणार आहे. त्यामुळे आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे यावेळी तरी शक्य होणार नाही.
महत्वाच्या बातम्या-
-लोकसभा निवडणूक २०२४: शिरुर लोकसभेच्या रिंगणात भाजपची उडी
-पुण्याच्या विकासासाठी शिवाजीराव मानकरांचे ‘हे’ व्हीजन; सांगितली विकासाची चतु:सूत्री
-महाविकास आघाडीत बिघाडी??? मावळ मतदारसंघात वंचितने केला दावा
-रविंद्र धंगेकर पुणे लोकसभा निवडणूक लढणार?; पक्षाकडे केली उमेदवारीची मागणी
-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ सहा मेट्रो स्टेशनची नावे बदलणार