पुणे : येत्या काही दिवसातच लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजू शकते. यामुळे राज्यातील सर्वच पक्ष जागांची चाचपणी आणि दावा करत आहेत. सर्व राजकीय पक्षांच्या पसंतीचा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघ हा आहे. शिवसेना शिंदे गटाचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पुन्हा एकदा मावळच्या उमेदवारीवर दावा केला आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांची उमेदवारी जवळपास निश्चितच आहे. शिवसेनेचे संजोग वाघेरे यांनी मतदारसंघात प्रचार देखील सुरू केल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता पुण्यातील मावळ लोकसभेवर आता वंचित बहुजन आघाडीने दावा केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. आणि स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचा इशारा वंचितचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी दिला आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांच्या उमेदवारीबाबत जवळपास निश्चिती असताना आघाडीचा घटक पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी मावळ लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात २०१९ ला झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये ऐनवेळी उभा केलेल्या वंचितच्या उमेदवाराला लाखभर मते मिळाली होती.
‘हा मतदारसंघ आमच्या हक्काचा असून आम्ही यावर दावा केला आहे. वंचित बहुजन आघाडीकडून आधीच २७ जागांवर चाचपणी सुरू असून त्यात पुणे आणि मावळ लोकसभेचा समावेश आहे’. अशी मागणी वंचितने केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महत्वाच्या बातम्या-
-रविंद्र धंगेकर पुणे लोकसभा निवडणूक लढणार?; पक्षाकडे केली उमेदवारीची मागणी
-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ सहा मेट्रो स्टेशनची नावे बदलणार
-“पवार कुटुंब आजही एकत्रच, निनावी पत्राबाबत माहिती नाही”; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
-‘नमो रोजगार मेळाव्या’च्या कार्यक्रम पत्रिकेतून नाव वगळलं; शरद पवार मेळाव्याला उपस्थित राहणार??