पुणे : येत्या लोकसभा निवडणुकीची राज्यात रणधुमाळी सुरु आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी रवींद्र धंगेकर यांनी आपला पत्ता खोलला आहे. गेल्या काही दिवसांपासून रविंद्र धंगेकर यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चे होतोच मात्र आता त्यांनी जाहीरपणे उमेदवारी मागितली असल्याचे सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविंद्र धंगेकरांना विचारण्यात आले असताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. “माझ्या पक्षाकडे मी उमेदवारीची मागणी केली आहे. पक्षाने विश्वास ठेवल्यास मी तो नक्की सार्थ ठरवेन. सातत्याने ९ वेळा मी निवडणूक लढलो असून लोकांनी विश्वास ठेवला आहे”, असंही रविंद्र धंगेकर म्हणाले आहेत. “पक्षाने अद्याप कोणतीही तयारी करायला सांगितली नाही. माझा डीएनए छत्रपतींचा आहे. छत्रपतींनी सर्व समावेश स्वराज्य उभा केलं. त्यांच्याच भागात मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे”, असं रविंद्र धंगेकर म्हणाले आहेत.
पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून सुरुवातीला माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे, माजी सचिव सुनील देवधर आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नेहमी कार्यरत असणारे शिवाजी मानकर यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे आता पुणे लोकसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस ही लढत कोणत्या दोन उमेदवारांमध्ये पहायला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना रविंद्र धंगेकरांनी ड्रग्ज प्रकरणावरुन सरकारवर ताशेरे ओढले आहेत. “अनेक खेड्यात अमली पदार्थ विकले जातात. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात संजीव ठाकूर यांना अटक झालेली नाही. आमच्या तरुणाईला बिघडवण्याची काम शासन स्तरावरून होत आहे. पुण्यातील पब संस्कृतीला माझा विरोध आहे. नाशिक, छत्रपती संभाजी नगर, दौंड या भागामध्ये प्रचंड प्रमाणात ड्रग सापडत असताना पोलीस प्रशासन काय करत आहे? टेकडीवर नशेत सापडलेल्या आमच्या मुली होत्या, तर मग आम्ही बघत बसायचे का? असा सवाल रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ सहा मेट्रो स्टेशनची नावे बदलणार
-“पवार कुटुंब आजही एकत्रच, निनावी पत्राबाबत माहिती नाही”; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
-‘नमो रोजगार मेळाव्या’च्या कार्यक्रम पत्रिकेतून नाव वगळलं; शरद पवार मेळाव्याला उपस्थित राहणार??
-पुणे वाहतूक समस्येची उच्च न्यायालयाने घेतली दखल; पोलीस आयुक्तांना दिले ‘हे’ आदेश