पुणे : पुणे शरहात असलेल्या मेट्रो स्टेशनपैकी अनेक स्टेशनच्या नावांवर आक्षेप घेण्यात आला आहे. महामेट्रोने सुरवातीला प्रकल्प विकास आराखड्यात दिलेली नावे तशीच कामय ठेवली गेली आहेत. मात्र या नावांमध्ये बदल करण्याची मागणी आता जोर धरताना दिसत आहे. राज्य सरकारने आता स्थानकांची नावे बदलण्याचे अधिकार महामेट्रोला दिलेले आहेत. त्यामुळे महामेट्रोकडून सहा स्थानकांची नावे बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. पुणे मेट्रोचा पहिला टप्पा मार्च २०२२ मध्ये सुरू झाल्यापासून स्थानकांच्या नावात बदल करण्याची मागणी होत होती.
भोसरी स्थानकाचे नाव नाशिक फाटा करावे, ही मागणी सर्वप्रथम पुढे आली. कारण हे स्थानक नाशिक फाट्यावर असून, भोसरी तेथून ५ किलोमीटर अंतरावर आहे. अनेक प्रवाशांना याची माहिती नसल्याने स्थानकावर पोहोचल्यानंतर त्यांना आपण भोसरी नसून नाशिक फाटा येथे आल्याचे निदर्शनास येते. त्यानंतर प्रवाशांना तिथून इतर वाहतूक पर्यायाचा वापर करून भोसरीपर्यंत जावे लागते.
पुणे मेट्रोच्या सिव्हील कोर्ट, शिवाजीनगर, मंगळवार पेठ, बुधवार पेठ आणि आयडियल कॉलनी या स्थानकांच्या नावात बदल करण्याची मागणीही नंतर करण्यात आली. अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी ही मागणी केली होती. यातील अनेक नावांना आक्षेप घेण्यात आला तर काहींना पर्यायी नावे देण्याची मागणी करण्यात आली आहे. नुकतेच ठाकरे गटाने बुधवार पेठ स्थानकाचे नाव कसबा पेठ मेट्रो स्थानक करावे, या मागणीसाठी आंदोलन केले.
राज्य सरकारने मेट्रो स्थानकाच्या नावात बदल करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार महामेट्रोला स्थानकांची नावे बदलण्याचा अधिकार देण्यात आला आहे. महामेट्रोकडून मंगळवार पेठ, बुधवार पेठ, आयडियल कॉलनी, सिव्हील कोर्ट, शिवाजीनगर आणि भोसरी या ६ स्थानकांच्या नावात बदल करण्याचा विचार सुरू आहे. स्थानकांच्या नावात बदल करण्यासाठी महामेट्रोकडून लवकरच एक समिती स्थापन केली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“पवार कुटुंब आजही एकत्रच, निनावी पत्राबाबत माहिती नाही”; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
-‘नमो रोजगार मेळाव्या’च्या कार्यक्रम पत्रिकेतून नाव वगळलं; शरद पवार मेळाव्याला उपस्थित राहणार??
-पुणे वाहतूक समस्येची उच्च न्यायालयाने घेतली दखल; पोलीस आयुक्तांना दिले ‘हे’ आदेश
-..म्हणून देवेंद्र फडणवीस परत एकदा म्हणाले, “मी पुन्हा येईन”