पुणे : राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच राजकारणासाठी पवार कुटुंबाला विरोधात निवडणुक लढताना पहायला मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर पवार कुटुंबातील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आमने सामने आले आहेत. बारामती शहरात पवार कुटुंबाविषयी एक निनावी पत्र समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात आले. ते पत्र कोणी प्रसारित केले, याची चर्चा बारामतीबरोबरच जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली असतानाच बारामतीच्या खासदार सुळे यांनी त्याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचे स्पष्ट केले.
‘पवार कुटुंब आजही एकच आहे. कुटुंबामध्ये महत्त्वाचे निर्णय एकत्रितपणे घेतले जातात. छोटे-छोटे निर्णयही एकत्रित विचारातून घेतले जातात. त्यामुळे बारामतीमधील ‘ते’ निनावी पत्र समाजमाध्यमातून कोणी प्रसारित केली, याची माहिती नाही’, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.
‘पवार कुटुंब आजही एकच आहे. कुटुंबामधील महत्त्वाचे निर्णय एकत्रितपणे घेतले जातात. छोटा निर्णयही एकत्रित विचारातून होतात. लग्न, शिक्षण असे अनेक निर्णय एकत्रित घेतले जातात. कुटुंबामध्ये निर्णय घेताना एखाद्याला पुढे मागे व्हावे लागते,’ असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.
‘अनेक भ्रष्टाचारी भाजपमध्ये गेले आहेत. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप होतो. भ्रष्टाचाराचा नाही. आम्ही घराणेशाही जपणारे आहोत, हे मी संसदेमध्येही म्हटले आहे. भाजपमध्येही घराणेशाही आहे. पक्षाची लढाई दडपशाही विरोधातील आहे. ती लढाई व्यक्तिगत नाही. राज्याच्या विरोधात असणाऱ्यांसमोर आम्ही उभे आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच शरद पवार यांना पद्मविभूषण देऊन गौरविले होते. त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्री असताना पवार यांनी चुकीची कामे केल्याच्या मोदींच्या आरोपावर काही बोलणार नाही’, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘नमो रोजगार मेळाव्या’च्या कार्यक्रम पत्रिकेतून नाव वगळलं; शरद पवार मेळाव्याला उपस्थित राहणार??
-पुणे वाहतूक समस्येची उच्च न्यायालयाने घेतली दखल; पोलीस आयुक्तांना दिले ‘हे’ आदेश
-..म्हणून देवेंद्र फडणवीस परत एकदा म्हणाले, “मी पुन्हा येईन”
-महायुतीच्या जागा वाटपाआधी राजकारणात मोठ्या हालचाली; आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?