पुणे : संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघताना दिसत आहे. महाराष्ट्र मध्ये देखील सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याने वाढत्या उन्हासोबत राजकीय वातावरण देखील चांगले तापतायला सुरुवात झालीय. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सद्या पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदरसंघाकडे लागले आहे. इतिहासात पहिल्यांदाच येथे जेष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये सामना होतोय.
विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार ही थेट लढत होण्याची दाट शक्यता आहे. अजित पवार यांचं संपूर्ण कुटुंब बारामतीच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत असून त्यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे मतदारसंघ धुंडाळून काढत आहेत. अजित पवार यांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार हे सध्या सक्रिय राजकारणापासून काहीसे बाजूला गेल्याचे चित्र असताना जय पवार यांनी मात्र आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे.
आज पुण्यामध्ये डिपी रोडवर असणाऱ्या शुभारंभ लॉन्स येथे जय पवार यांचा वाढदिवसाचा जंगी कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या सोबतीनेच भाजप आरपीआयचे नेते आणि कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते. हा कार्यक्रम सुरू असताना जय पवार यांनी भेटीगाठी दरम्यान ‘आधी बारामतीचे उरकतो मग पुण्यातच आहे’ असं म्हणत बारामतीनंतर आता पुण्यात सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात गाडी तोडफोड सुरुच; येरवड्यात कोयता गँग नंतर आता कोंढव्यात दारूच्या नशेत ८ गाड्या फोडल्या
-निलेश राणेंना पुणे पालिकेचा दिसाला; कमीचा धनादेश स्वीकारत थकबाकी केली शून्य
-भाजप इच्छुकांची धाकधूक वाढली; आज कृपाशंकर सिंह जाणून घेणार “मन की बात”
-सगेसोयऱ्यांचा गोतावळ्यामुळे शिवाजी मानकरांना ताकद; पुणे लोकसभेसाठी करणार दावेदारी प्रबळ
-राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; अवैध दारूसह सुमारे २ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त