पुणे : पुणे शरहात वाढती गुन्हेगारी काही केल्या कमी होत नाही. शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढतानाच दिसत आहे. दररोज शहरात नवनवीन घटना घडत असतात. कालच येरवडा भागात कोयता गँगने दहशत माजवत होता. या कोयता गँगने दहशत माजवताना परिसरातील १०-१२ गाड्यांची तोडफोड केली आहे. त्यातच सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात वाहनांची तोडफोड केल्याचं समोर आलं आहे.
शहरातील मुंढवा भागात दारूच्या नशेत आरोपींकडून ८ गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार आता समोर आला आहे. आरोपींनी परिसरात धुडगूस घातला आहे. हा सगळा प्रकार समजताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. त्यांनी आरोपीला शोधून काढलं. आणि मुंढवा पोलिसांनी ८ आरोपींना अटक केली आहे.
या भुरट्यांकडून नागरिकांच्या महागड्या गाड्या फोडल्या जात आहे. त्यासोबतच गाड्यांचं नुकसान झालं आहे. सामान्य नागरिकांना हा भुरदंड भरावा लागतो आहे. दररोज सुरु असणाऱ्या अशा घटनांमुळे परिसारातील लोक त्रस्त झाले आहेत.
दररोज काहीना काही घटना घडत आहेत. भर दिवसा कोयता घेऊन दहशत माजवत आहेत. तर कधी थेट रस्त्यांवर हत्या केली जात आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून रस्त्यावर गाड्यांची तोडफोडदेखील सुरु आहे. दरम्यान या हे गुन्हेगारी सत्र संपणार कधी हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-निलेश राणेंना पुणे पालिकेचा दिसाला; कमीचा धनादेश स्वीकारत थकबाकी केली शून्य
-भाजप इच्छुकांची धाकधूक वाढली; आज कृपाशंकर सिंह जाणून घेणार “मन की बात”
-सगेसोयऱ्यांचा गोतावळ्यामुळे शिवाजी मानकरांना ताकद; पुणे लोकसभेसाठी करणार दावेदारी प्रबळ
-राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; अवैध दारूसह सुमारे २ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
-मुरलीधर मोहोळांच्या मागणीला फडणवीसांचा बूस्टर; पुण्यासाठी एका फटक्यात आणला २०० कोटींचा निधी