पुणे : भाजप नेते निलेश राणे यांना हॉटेल कर थकबाकी प्रकरणी पुणे महापालिकेकडून दिलासा मिळाला आहे. निलेश राणे यांनी २५ लाखांचा धनादेश पुणे महानगरपालिकडे सुपूर्त केला आहे. त्यानंतर त्यांची थकबाकी महापालिकेकडून शून्य करण्यात आली आहे. राजकीय दबावापोटी त्यांची थकबाकी शून्य करण्यात आल्याचा आरोप आता विरोधकांकडून करण्यात येत आहे. निलेश राणे यांची डेक्कन परिसरात व्यावसायिक जागा आहे.
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच डेक्कन भागात असलेल्या आर डेक्कन येथील व्यवसायिक जागेचा कर न भरल्याने पुणे महानगरपालिकेने मंगळवारी राणेंच्या हॉटेलला टाळे ठोकली होती. शिवाजीनगर विभागाच्या हद्दीत हे आर डेक्कन कॉर्नर येथे राणेंच्या मालकीचा मॉल आहे. या जागेसाठी पुणे महापालिकेने ३ कोटी ७७ लाख रुपयांची थकबाकी असल्याचं जाहीर केलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत राणेंची मालमत्ता सील केली होती.
शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून राणेंच्या हॉटेलबाहेर आंदोलन करण्यात आले होते. निलेश राणेंकडून थकबाकीची वसुली करण्यात यावी अशी मागणी लावून धरली होती. ३ कोटी ७७ लाख थकबाकी असताना निलेश राणे यांनी २५ लाखांचा धनादेश पुणे महापालिकेकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. पुणे महापालिकेने यासंदर्भात सांगितलं की, उर्वरीत मालमत्तेप्रकरणी वाद सुरु आहे. त्यामुळे सध्या मिळकत कर शून्य करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भाजप इच्छुकांची धाकधूक वाढली; आज कृपाशंकर सिंह जाणून घेणार “मन की बात”
-सगेसोयऱ्यांचा गोतावळ्यामुळे शिवाजी मानकरांना ताकद; पुणे लोकसभेसाठी करणार दावेदारी प्रबळ
-राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; अवैध दारूसह सुमारे २ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
-मुरलीधर मोहोळांच्या मागणीला फडणवीसांचा बूस्टर; पुण्यासाठी एका फटक्यात आणला २०० कोटींचा निधी
-बारामती बसस्टँडच्या उद्घाटनाचे आमंत्रण नाही; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बारामतीत तो प्रोटोकॉल…..”