पुणे : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. भाजपने यासाठी आज गुरुवारी २०१९ मध्ये लढवलेल्या २३ लोकसभा मतदारसंघांमध्ये आपले निरीक्षक पाठवले आहेत. आमदार आशिष शेलार यांच्याकडे पुण्याचे निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.
अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे आशिष शेलार येऊ शकणार नाहीत. त्यामुळे ही जबाबदारी आता भाजपचे वरिष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांच्याकडे दिली आहे. कृपाशंकर सिंह आज पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही नावे हायकमांडला पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे.
पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपमधील अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. भाजपकडून सुरुवातीला माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे, माजी सचिव सुनील देवधर आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नेहमी कार्यरत असणारे शिवाजी मानकर यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे आज पदाधिकारी आणि कृपाशंकर सिंह यांच्या चर्चेत नेमकी कोणाची नावे हायकमांडकडे जाणार याकडे सर्वांच लक्ष लागून आहे. तसेच इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप अद्यापही निश्चित झालेलं नाही. मात्र गेल्या वेळी लढवलेल्या २३ जागा भाजप परत लढवणार असल्याचं माहिती मिळत आहे. त्या २३ जागा आणि आणखी ५ जागा भाजप लढणार असल्याच्या दाट शक्यता आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-सगेसोयऱ्यांचा गोतावळ्यामुळे शिवाजी मानकरांना ताकद; पुणे लोकसभेसाठी करणार दावेदारी प्रबळ
-राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; अवैध दारूसह सुमारे २ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
-मुरलीधर मोहोळांच्या मागणीला फडणवीसांचा बूस्टर; पुण्यासाठी एका फटक्यात आणला २०० कोटींचा निधी
-बारामती बसस्टँडच्या उद्घाटनाचे आमंत्रण नाही; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बारामतीत तो प्रोटोकॉल…..”
-पुणे ड्रग्ज रॅकेट! कुरकुंभ ते दिल्ली अन् दिल्लीहून विमानाने १४० किलो मेफेड्रोन लंडनला रवाना