पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूटीनंतर बारामती लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे बारामतीमध्ये सभा, बैठका घेत प्रचार करत आहेत. त्यातच आता अजित पवार हे बारामतीमधील विकासकामांचे म्हणजेच बारामती बस स्थानकाचे उद्घाटन त्याचबरोबर इतर कामांच्या उद्घाटन समारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. त्यातच २ मार्च रोजी बारामतीमध्ये अजित पवार यांनी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. यावरुन सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
“बारामतीत हे कार्यक्रम होत असल्याची माहिती मला पत्रकारांकडूनच मिळालेली आहे. बारामतीत २ मार्चला होणाऱ्या नमो महारोजगार मेळावा आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अद्याप मला निमंत्रण मिळालेले नाही. २०१५च्या शासनाच्या जीआरनुसार अशा कार्यक्रमांमध्ये स्थानिक लोकसभा, राज्यसभा खासदारांचे नाव घालावे लागते. बारामतीत तो प्रोटोकॉल पाळला जातो की नाही?, हा प्रश्न आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
“आम्ही सत्तेत असताना प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करत होतो. तत्कालीन स्थानिक खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे पत्रिकेत नाव नसल्याचे तत्कालीन मंत्री शरद पवार यांनी कार्यक्रमाला येणे टाळले होते, अशी आठवण सुप्रिया सुळे यांनी करुन दिली आहे.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर माझा विश्वास असून ते मला महारोजगार मेळाव्याला बोलवतील अशी अपेक्षा. महारोजगार मेळाव्याची संकेतस्थळावर नोंदणी होत नाही, OTP येत नाही अशा अडचणी उमेदवारांना येत असून यासंबंधी त्यांच्या कार्यालयाशी बोलणार आहे. शरद पवार यांनी ५० वर्षांपूर्वी उभ्या केलेल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये ‘नमो महारोजगार मेळावा’ होतो आहे. ही संस्था त्यासाठी उपयोगी येते याचा आनंद आहे”, असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे ड्रग्ज रॅकेट! कुरकुंभ ते दिल्ली अन् दिल्लीहून विमानाने १४० किलो मेफेड्रोन लंडनला रवाना
-ठाकरेंची शिवसेना आक्रमक; ‘बुधवार पेठ नाही तर कसबा पेठ मेट्रोस्टेशन हेच नावं हवं’
-आढळराव पाटील नाही तर आता भाजपच्या ‘या’ नेत्याने अमोल कोल्हेंविरोधात दंड थोपटले
-राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्या मातोश्री मधुवंती पाटणकर यांचे निधन
-“आमच्या काकांनी मला अडचणीत आणण्यासाठी गुंडांना…”; रोहित पवारांचा अजितदादांवर गंभीर आरोप