पुणे : पुणे अंतराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटबाबत अतिशय महत्वाची आणि मोठी माहिती आता समोर आली आहे. कुरकुंभ येथे तयार केले जात होते ते ड्रग्ज आधी दिल्ली आणि त्यानंतर लंडनमध्ये पाठवण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
अत्यंत महत्वाची बाब म्हणजे हे ड्रग्ज विमानाने फुड डिलिव्हरी सर्व्हिस मार्फत पाठवण्यात आले होते. दिल्लीतून तब्बल १४० किलो एमडी ड्रग्जची लंडनमध्ये तस्करी करण्यात आली होती. या ड्रग्जची किंमत साधारण २८० कोटी रुपये आहे.
पुणे पोलिसांनी देशातील सर्वात मोठे ड्रग्ज प्रकरण उघकीस आणले आणि शहरातील विविध ठिकाणाहून तब्बल ४ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. हे ड्रग्ज पुणे जिल्ह्यातील कुरकुंभमध्ये असलेल्या कारखान्यात तयार करण्यात येत होते. हे ड्रग्स फूड कुरिअर सर्व्हिसच्या माध्यमातून पाठवले जात होते.
दिल्लीमध्ये दोघेजण अधिकृत फूड कुरिअरचा व्यवसाय करत होता. याच फूड कुरिअरच्या माध्यमातून हे पार्सल पाठवले जात होते. हे ड्रग्ज लंडनला पाठवण्याची जबाबदारी दिवेश भुटीया, संदीप कुमार, संदीप यादव या तिघांवर होती. आतापर्यंत या प्रकरणात पुणे पोलिसांनी ८ जणांना अटक केली आहे. पुणे पोलिसांची गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ठाकरेंची शिवसेना आक्रमक; ‘बुधवार पेठ नाही तर कसबा पेठ मेट्रोस्टेशन हेच नावं हवं’
-आढळराव पाटील नाही तर आता भाजपच्या ‘या’ नेत्याने अमोल कोल्हेंविरोधात दंड थोपटले
-राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्या मातोश्री मधुवंती पाटणकर यांचे निधन
-“आमच्या काकांनी मला अडचणीत आणण्यासाठी गुंडांना…”; रोहित पवारांचा अजितदादांवर गंभीर आरोप
-“मी राजकारणात असतो तर…”; व्हायरल पत्रानंतर राजेंद्र पवारांची प्रतिक्रिया