पुणे : पुणे शहरातील शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. शहरातील एका मेट्रोस्थानकाला ‘बुधवार पेठ मेट्रोस्थानक’ असे नाव दिल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी बुधवार पेठ मेट्रोस्थानक हा बोर्ड काढून कसबा पेठ मेट्रोस्थानक असा बोर्ड लावला आहे.
शिवसेना गटाचे पुणे शहरातील अनेक पदाधिकारी या मेट्रो स्टेशनवर पोहचले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. या मेट्रोस्टेशनवर पोलीसही पोहचले होते. मात्र पोलिसांना न जुमानता शिवसेनचे ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी स्टेशनमध्ये जात त्यांनी आंदोलन केले आणि त्यांनी नाव बदलण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, पुणे शहारातील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मेट्रो स्टेशनमधील बुधवार पेठ मेट्रो स्टेशनचा बोर्ड हटवून त्या जागी कसबा पेठ मेट्रो स्टेशनचा बोर्ड लावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आढळराव पाटील नाही तर आता भाजपच्या ‘या’ नेत्याने अमोल कोल्हेंविरोधात दंड थोपटले
-राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्या मातोश्री मधुवंती पाटणकर यांचे निधन
-“आमच्या काकांनी मला अडचणीत आणण्यासाठी गुंडांना…”; रोहित पवारांचा अजितदादांवर गंभीर आरोप
-“मी राजकारणात असतो तर…”; व्हायरल पत्रानंतर राजेंद्र पवारांची प्रतिक्रिया
-निलेश राणेंना पुणे महापालिकेचा दणका, करोडोंची प्रॉपर्टी केली सील; मोठं कारण आलं पुढे