पुणे : राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे, तर दुसरीकडे राज्य सरकारला हादरुन सोडणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरुच ठेवले आहे. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
“मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केल्यानंतर मी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर मनोज जरांगे यांच्याशी आजपर्यंत मी एकही शब्द बोललेलो नाही. आमची कोणतीही भेट झालेली नाही, असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेच मनोज जरांगे पाटील यांचे बोलविते धनी असल्याचा आरोप केला होता. जबाबदारीच्या पदावर बसलेली लोकं इतकं पोरकट बोलतात, हे मी महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात कधीच पाहिले नाही”, असा टोला शरद पवार यांनी लगावला. ते मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार यांनी मनोज जरांगे यांच्याशी कोणतेही संबंध असल्याचे आरोप सपशेल फेटाळून लावला आहे. “जरांगे आणि माझा संबंध विचारात घेतला तर त्यांचे उपोषण सुरु झाल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा मी त्यांनी म्हणालो होतो की, तुमच्या मागण्या आणि आग्रह मी समजू शकतो. दोन समाजांमध्ये अंतर वाढेल, असं काही करु नका. महाराष्ट्राचं ऐक्य टिकेल, असे वागा, असे मी त्यांना सांगितले होते. त्यानंतर मनोज जरांगे यांच्याशी माझे एकाही शब्दाने बोलणे झालेले नाही”, असे शरद पवार यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“जरांगेंना शरद पवार, रोहित पवारांकडून मदत मिळते, त्यांचं आंदोलन स्क्रिप्टेड आहे”
-पुण्यात बनवल्या जात होत्या बनावट नोटा; पोलिसांनी ६ जणांना केलं जेरबंद
-यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात पुणे जिल्हयाला काय काय मिळालं? वाचा एका क्लिकवर
-वसंत मोरेंच्या मनात नेमकं काय? सुप्रिया सुळेंसह घेतली शरद पवारांची भेट, चर्चेला उधाण
-कसब्यातील प्रलंबित विकासकामे लवकर मार्गी लावा, हेमंत रासनेंनी घेतली पालिका आयुक्तांची भेट