पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राच्या २०२४-२५ या वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकरी, मागासवर्गीय, युवक, महिला, विद्यार्थी, आदिवासी, अल्पसंख्यांक, उद्योजक, व्यापारीस व्यावसायिक, कष्टकरी अशा समाजातील सर्व घटकांना न्याय आणि विकासाटी संधी उपलब्ध करुन देण्याचा विशेष प्रयत्न केला आहे.
अर्थसंकल्पात पुण्यासाठी विशेष घोषणा
- राजगुरु नगरच्या हुतात्मा श्री शिवराव हरी राजगुरु जन्मस्थळ विकासासाठी पहिल्या टप्प्यात 102 कोटी विकास निधी देण्यात आला आहे.
- मौजे वडज, तालुका जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय
- पुणे चक्राकार वळण मार्गाकरीता भूसंपादनासाठी 10 हजार 519 कोटी
- पुणे-लोणावळा रेल्वे मार्गांकरिता 50 टक्के आर्थिक सहभाग
- संगमवाडी, पुणे येथे लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक
- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर, ता. हवेली व समाधी स्थळ वढू बुद्रुक तालुका शिरुर, जिल्हा पुणे येथील स्मारक- 270 कोटी रुपये किमतीचा आराखडा, काम सुरु
- लोणावळा, जिल्हा पुणे येथे जागतिक दर्जाचा स्कायवॉक प्रकल्प- 333 कोटी 56 लाख किंमत
- 50 नवीन पर्यटन स्थळांच्या ठिकाणी थीम पार्क, ॲडव्हेंचर स्पोर्टस्, शॉपिंग मॉल, वॉटर पार्क आणि निवास व्यवस्था
- नागपूर एम्सच्या धर्तीवर औंध, पुणे येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था
- कल्याण-मुरबाड, पुणे-नाशिक आणि सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वे मार्गांचे भूसंपादन सुरु
- एकविरादेवी मंदिर जिल्हा पुणे तिर्थक्षेत्र विकास प्राधिकरणांची स्थापना
🔰27-02-2024 🛣️ मुंबई महाराष्ट्र राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 सादर करताना Live
https://t.co/cPdsoS7VtP— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 27, 2024
या अर्थसंकल्पातून महाराष्ट्र राज्याची १ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी आवश्यक धोरणांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक, नागरिकांचे जीवनमान उंचावण्याकरिता विकास योजनांवर भर देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वसंत मोरेंच्या मनात नेमकं काय? सुप्रिया सुळेंसह घेतली शरद पवारांची भेट, चर्चेला उधाण
-कसब्यातील प्रलंबित विकासकामे लवकर मार्गी लावा, हेमंत रासनेंनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
-पुणे शहराला हवा “व्हिजनरी” खासदार, कोणाचे पारडे जड जनताच ठरवणार; हे मुद्दे एकदा वाचाचं
-पुणेकरांनो पाणी जपून वापरा! पाणीकपात टळली मात्र, या भागांत गुरुवारी पाणी पुरवठा बंद