पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांमध्ये टीका-टीपण्णी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच हे सर्व सुरु आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटासाठी महत्वाचा असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक भागात दौरे आणि मेळावे घेत आहेत.
बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार असे जवळपास निश्चित झालं आहे. यावरुन राष्ट्रवादी पक्षात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आज मंगळवारी शरद पवारांनी पुण्यात बैठक बोलावली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मनसेचे नेते वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
मनसेचे वसंत मोरे यांनी निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवार यांची घेतली भेट@vasantmore88 @NCPspeaks @PawarSpeaks @supriya_sule #LokSabhaElection2024 @mnsadhikrut pic.twitter.com/lsgD3Mme2u
— Pune Local पुणे लोकल (@pune_local) February 27, 2024
कात्रज डेअरीच्या मागील बाजूस असलेल्या जागेत पुणे महापालिका आयुक्तांमार्फत चुकीचे आरक्षण टाकण्यात आले आहे. त्या संदर्भात सह्यांची मोहीम हाती घेऊन नागरिकांमध्ये प्रबोधन केले जात आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील हा प्रश्न मांडला. पण काही मार्ग निघाला नाही. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघ हा कात्रज भागात येतो. त्यामुळे आज खासदार सुप्रिया सुळे यांना भेटण्यास आलो होतो. त्यावेळी शरद पवार यांची भेट झाली आणि त्यांना देखील निवेदन दिले. या प्रश्नावर लक्ष घालून मार्ग काढला जाईल, असे शरद पवार यांनी सांगितलं असल्याचं वसंत मोरे म्हणाले आहेत.
या भेटीतून कोणत्याही प्रकारचा राजकीय अर्थ काढू नये, माझ्या प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. अनेक नेते मंडळी विविध प्रश्नांसंदर्भात विरोधी पक्षातील नेत्यांची देखील भेट घेतात. त्यानुसार माझी आजची ही भेट आहे. आणि मी पुणे लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहे, असे वसंत मोरे यांनी सांगितलं आहे.
एकीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या गटाचे नविन पक्ष चिन्हाच्या अनावरण सोहळ्यावरुन शरद पवारांवर गरळ ओकली तर दुसरीकडे वसंत मोरे यांनी आता शरद पवारांची भेट घेतली आहे. यावरुन राजकीय वर्तुळात वेगळा सुर उमटत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कसब्यातील प्रलंबित विकासकामे लवकर मार्गी लावा, हेमंत रासनेंनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
-पुणे शहराला हवा “व्हिजनरी” खासदार, कोणाचे पारडे जड जनताच ठरवणार; हे मुद्दे एकदा वाचाचं
-पुणेकरांनो पाणी जपून वापरा! पाणीकपात टळली मात्र, या भागांत गुरुवारी पाणी पुरवठा बंद