पुणे : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सोमवारी पिंपरी चिंचवडमध्ये गजानन बाबर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आले होते. या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, खासदार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभंं राहण्याचं आवाहन केलं आहे.
महाराष्ट्र, मराठी अस्मिता आणि लोकशाही टिकवायची असेल तर संघर्षासाठी तयार रहा. यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे रहा, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. गजानन बाबर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील आणि खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.
“पुरंदरच्या तहाचा इतिहास सांगितला गेला. युद्धात जिंकतो अन् तहात हरतो, असं सांगितलं जातं. पण असं आता होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी २३ किल्ले दिले ना? ठाकरेंनी ४० आणि पवार साहेबांनी ४० आमदार दिले. ज्याला ते किल्ले दिले त्या औरंगजेबला इथेच गाडलं गेलं. शाहिस्तेखानाची बोटे आणि अफजलखानाचा कोथळा महाराष्ट्रात काढला गेला. आता ४० अधिक ४० आणि काँग्रेसचा एक असे ८० आणि एकूण १८१ किल्ले आपण परत जिंकू”, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस(खरी) च्या प्रचाराची तुतारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सातारा येथे फुंकली..हा एक अपूर्व योगायोग!लवकरच ते अशा प्रकारे शिवसेनेची मशाल घेऊनही राज्यात फिरतील.
ही तर श्रींची इच्छा!
फडणवीस यांनी माहविकास आघाडीच्या विजयाची तुतारी फुंकल्या बद्दल त्यांचे आभार!…— Sanjay Raut (@rautsanjay61) February 26, 2024
“शरद पवार साहेब आत्ता सभागृहात जे सुरुये, ती विजयाची तुतारी आहे. देवेंद्र फडणवीस काल साताऱ्यात गेले त्यावेळी छत्रपती उदयनराजेंच्या राजवाड्यात गेले. त्यावेळी पन्नास तुताऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं, हे पाहून फडणवीस गांगरून गेले. त्यांना काय करावं हेच कळेना. त्यामुळे तुतारी आणि मशाल हे चिन्ह मिळणं शुभसंकेत आहेत”, असे संजय राऊत यांनी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पिंपरी-चिंचवड बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात चढाओढ
-‘पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी संधी हवी’; शिवाजी मानकरांनी भाजपकडे मागितली उमेदवारी
-काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळला; डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल
-शिरुरच्या जागेवरुन आढळराव पाटलांचा युटर्न; अजितदादांची मजबूत फिल्डींग
-लेकीसाठी बापानं कंबर कसली; अजित पवारांना शह देण्यासाठी बोलवली महत्वाची बैठक