पुणे : पुणे शहरामध्ये काँग्रेस भवन येथे सोमवारी सायंकाळी युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. दिल्ली-हरियाणा सीमेवर शेतकरी आंदोलना दरम्यान एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करणार होते त्यापूर्वीच पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुणे शहरातील जंगली महाराज रोडवरील झाशीची राणी चौकात काँग्रेसचे कार्यकर्ते जमले. दिल्ली-हरयाणा सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू असताना एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते सोमवारी सायंकाळी जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौकात जमले. कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला आहे.
आंदोलनावेळी बंदोबस्तास असलेले डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस, उपनिरीक्षक महेश भोसले, दत्तात्रय सावंत यांनी कार्यकर्त्यांना रोखले. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना डेक्कन पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन काँग्रेस कार्यकर्ते ऋषिकेश उर्फ बंटी बाबा शेळके, प्रथमेश विकास आबनावे, एहसान अहमद खान, मुरलीधर सिद्धाराम बुधरामस, राहुल दुर्योधन शिरसाट यांच्याविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिरुरच्या जागेवरुन आढळराव पाटलांचा युटर्न; अजितदादांची मजबूत फिल्डींग
-लेकीसाठी बापानं कंबर कसली; अजित पवारांना शह देण्यासाठी बोलवली महत्वाची बैठक
-“मोदी जसे ‘चहा’ची स्टोरी सांगायचे आता तसं अजित पवार ‘अंडी विक्री’ची सांगतात”
-लोकसभा निवडणुकीबाबत सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य; म्हणाल्या…
-“शरद पवारांमुळेंच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही, बारामती २३ मार्चला मोर्चा…”