पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्यात बारामती मतदारसंघानंतर शिरुर लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही गटासाठी जितका बारामती मतदारसंघ महत्वाचा तितकाच शिरुर मतदारसंघही महत्वाचा आहे.
शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे हे या मतदारसंघाचे खासदार आहेत. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या या उमेदवाराला पाडण्याचं चॅलेंज दिले आहे. बारामती आणि शिरुर मतदारसंघासाठी शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दावा केला होता. आपणच त्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खरा दावेदार असल्याचं आढळराव पाटील यांनी म्हणाले होते. मात्र त्यानंतर पुणे म्हाडाचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आढळराव पाटलांनी आपल्या वक्तव्यावरून यूटर्न घेतला. म्हणून अजित पवार यांनी त्या जागेसाठी मजबुतीने फिल्डींग लावली आहे.
खुद्द शरद पवार हे उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही चुरशीने प्रचार करताना दिसत आहेत. त्यातच आता शिरुर लोकसभा निवडणुकीत आपले स्थान प्रस्थापित करण्यासाठी अजित पवार यांनी हुकमी एक्का बाहेर काढला आहे.
अजित पवार यांचे जुने निकटवर्ती प्रदीप दादा कंद शिरूर लोकसभा लढवणार असल्याची चर्चा आहे. मुख्य म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर प्रदीप कंद लढणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. प्रदीप कंद हे राष्ट्रवादीचे जुने जाणते नेते आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.
प्रदीप कंद यांनी पुणे जिल्हा परिषेदचे अध्यक्षपद भूषवले आहे. पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी ते आता विराजमान आहेत. सहकार क्षेत्रामध्ये दांडगा अनुभव आणि नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये त्यांनी शरद पवारांचं पॅनलही पाडलं होतं. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचा विचार करत असल्याचं बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लेकीसाठी बापानं कंबर कसली; अजित पवारांना शह देण्यासाठी बोलवली महत्वाची बैठक
-“मोदी जसे ‘चहा’ची स्टोरी सांगायचे आता तसं अजित पवार ‘अंडी विक्री’ची सांगतात”
-लोकसभा निवडणुकीबाबत सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य; म्हणाल्या…
-“शरद पवारांमुळेंच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही, बारामती २३ मार्चला मोर्चा…”
-“नवऱ्याला संसदेत अलाऊड नसतं, कॅन्टीनमध्ये पर्स सांभाळत बसावं लागतं”