पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर दोन्ही पक्षांसाठी महत्वाचा असणाऱ्या बारामती मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांनी आपली लेक खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी मतदारसंघात पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
बारामती मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा रथ फिरत आहेत. या विजय रथांच्या माध्यमातून दोन्ही गटांकडून चुरस सुरु आहे. त्यातच सुप्रिया सुळे यांचा विजय रथ रोखण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे. अजित पवार यांना शह देण्यासाठी आता खुद्द शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. लेकीसाठी शरद पवार यांनी रविवारी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
खासदार सुप्रिया सुळे या गेली ३ टर्म बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. २००९ साली त्या भाजपच्या कांता नलावडे यांच्या विरोधात सहज विजयी झाल्या. २०१४ साली देशभरात मोदी लाट असताना आणि भाजपने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मागे ताकद उभी केली असतानाही सुप्रिया सुळे यांनी बालेकिल्ला राखला.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही पुन्हा संपूर्ण देश हा मोदी लाटेत असताना आणि खुद्द अमित शहा यांनी बारामतीत सभा घेतली असतानाही सुप्रिया सुळेच विजयी झाल्या होत्या. अमित शहा यांनी भाजपच्या कांचन कूल यांना पराभूत करत सुप्रिया सुळे या सुमारे दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी झाल्या. त्यात अजित पवार यांनी आखलेली रणनीती महत्त्वाची ठरली. मात्र आता खुद्द अजित पवारच विरोधी बाकावरुन उठून भाजपसोबत जात सत्तेत बसले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“मोदी जसे ‘चहा’ची स्टोरी सांगायचे आता तसं अजित पवार ‘अंडी विक्री’ची सांगतात”
-लोकसभा निवडणुकीबाबत सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य; म्हणाल्या…
-“शरद पवारांमुळेंच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही, बारामती २३ मार्चला मोर्चा…”
-“नवऱ्याला संसदेत अलाऊड नसतं, कॅन्टीनमध्ये पर्स सांभाळत बसावं लागतं”
-ठरलं! बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारच; भाजपच्या बड्या नेत्याने सांगितलं A टू Z गणित