पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार असतील अशी जोरदार चर्चा आहे. त्यामुळे बारामतीमध्ये पवार कुटुंबातील नंदन-भावजय यांच्यामध्ये निवडणुकीच्या मैदानात लढाई होणार, हे मानले जातं असताना आता भाजपच्या बड्या नेत्याने सुनेत्रा पवार याच महायुतीच्या उमेदवार असतील, असे शिक्कमोर्तब केलं आहे.
भाजपचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलत असताना बारामती लोकसभेचे गणित मांडत सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा दावा केला आहे. गेल्या अनेक निवडणुकांत बारामतीमध्ये विजय मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत असून २०१४ ला थोडे दुर्लक्ष झाल्याने थोडक्यात पराभव झालं, परंतु आताच्या निवडणुकीत वेगळे चित्र असून आमची पारंपरिक ४ लाख मते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत उमेदवारीसाठी पवार नाव आल्याने सुनेत्रा वहिनी येथे दीड ते दोन लाख मतांनी विजयी होतील, यात कोणतीही शंका नसल्याचं काकडे म्हणाले आहेत.
सुप्रिया सुळे यांच्याकडे आता बहुतांश विधानसभा मतदारसंघात नेते आणि कार्यकर्ते राहिलेले नाहीत. इंदापूर, दौंड, खडकवासलामध्ये आमची ताकद आहे. तर भोर आणि पुरंदरमध्ये त्यांना केवळ घटक लक्ष काँग्रेसची मदत मिळेल, हे सर्व पाहता महायुतीचे पारडे भारी असल्याचं दावा काकडे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-धंगेकरांनी आव्हान देऊ नये, त्यांचा पराभव करायला फडणवीसांचा हा चेलाच भारी- काकडे
-Pune Drugs Racket: ड्रग्ज मालिका काही संपेना; कोंढव्यात सापडले २ किलो ड्रग्ज
-पुण्यातील मार्केट यार्ड आज शांत; कामगार संघटनांकडून बंदची हाक
-“कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसणे असा…”; अजित पवारांनी जनतेला लिहलं पत्र
-शिक्रापूरच्या शेतकऱ्यानं केली अफूची शेती; पोलिसांकडून १ हजार २२६ झाडे जप्त