पुणे : पुणे शहरात देशातील सर्वात मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणले आहे. पुणे पोलिसांनी आतापर्यंत ४ हजार कोटी रुपयांचे ड्रग्जचे साठे जप्त केले आहेत. या ड्रग्जचे कनेक्शन सांगली, दिल्ली आणि गोव्यातही असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत छापेमारी केली तरीही ड्रग्ज साठा सापडतच आहे. कोंढवा परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
अटक केलेल्या आरोपीचे नाव राजेश रमेश पवळे (वय २९, कात्रज) असे आहे. याप्रकणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढव्यातील खडीमशीन चौकातून येवलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकजण थांबला असून, त्याच्याकडे गांजा असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली.
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दुचाकीस्वार राजेश पवळेला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे गांजा आढळून आला. त्याच्याकडील दुचाकीची तपासणी केली, तेव्हा डिक्कीत १ किलो ८९२ ग्रॅम गांजा सापडला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यातील मार्केट यार्ड आज शांत; कामगार संघटनांकडून बंदची हाक
-“कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसणे असा…”; अजित पवारांनी जनतेला लिहलं पत्र
-शिक्रापूरच्या शेतकऱ्यानं केली अफूची शेती; पोलिसांकडून १ हजार २२६ झाडे जप्त
-बारामतीत पोस्टर झळकले ‘सुनेत्रा पवार फिक्स खासदार’; अजित पवार गटाचा उमेदवार ठरला???
-ड्रग्ज रॅकेट: पुणे पोलिसांनी देशातील सर्वात मोठी कारवाई; फडणवीसांनी दिले २५ लाखांचे रोख बक्षीस