पुणे : पुणेकरांवर मागील काही महिन्यांपासून पाणी कपातीची टांगती तलवार होती. पाणीकपात होणार आणि भर उन्हाळ्यात पुणेकरांना पाणीकपातीच्या संकटाला सामोरं जावं लागणार असल्याचं चित्र होतं. आता मात्र भर उन्हाळ्यातही पुणेकरांनी पाणी कपातीसारख्या अडचणीला सामोरं जावं लागणार नाही. कारण पुणेकरांची पाणी कपात आता टळली आहे.
उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज कालवा समितीची बैठक घेतली. या ‘कालवा समिती’च्या बैठकीत पुण्यात पाणीकपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘कालवा समिती’च्या बैठकीत धरण साखळीतील पाणी साठ्याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पाणी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खडकवासला धरण साखळीतून पुणे शहराला पाणी पुरवठा केला जातो. गेल्या वर्षी आजच्या तारखेला धरणांमध्ये १९.२८ टीएमसी पाणीसाठा होता. यावर्षी तो १६.२८ टीएमसी म्हणजे तब्बल ३ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. अशा परिस्थितीत शहराला पुढील किमान ५ महिने पुरेल अशा पद्धतीने पाण्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याने आजच्या बैठकीत पाणी कपातीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
सध्या तरी पुणेकरांची पाणी कपात केली जाणार नसल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. असं असलं तरी पुढच्या बैठकीत याबाबत पुन्हा विचार विनिमय होऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, पालकमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
२५ वर्षातील सर्वात कमी पाऊस यावेळी पुणे जिल्ह्यात धरण क्षेत्रात झाला होता मात्र तरीही यावेळी पुणेकरांना पाणी कपातील सामोरे जावे लागणार नाही. त्यासोबतच पुणे जिल्ह्यात शेतीलाही पाणी मिळणार आहे. शेतीसाठी उन्हाळ्यात दोन आवर्तन सोडली जाणार आहे. पहिलं आवर्तन ३ मार्चपासून सुरू होणार आहे. शेतीसाठी ७ टीएमसी पाणी सोडणार असल्याने शेतकऱ्यांनादेखील दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-घड्याळात वेळ झाली तुतारी वाजवण्याची; शरद पवार गटाकडून अनावरण सोहळ्याचा व्हिडीओ रिलीज
-शिंदे-फडणवीस-पवार २ मार्चला बारामतीत प्रचाराचा नारळ फोडणार!; अनेक विकासकामांचं उद्घाटन
-कात्रजच्या ‘क्वालिटी बेकरीत’ एक्सपायर फुडची विक्री; हिंदुत्ववादी संघटनेकडून बेकरीची तोडफोड
-Pune Drugs Racket: पुणे पोलिसांच्या धडक कारवायानंतर नाशिक पोलीस प्रशासन सज्ज
-पुण्यात इतकं ड्रग्ज सापडतंय याला गृहमंत्रीच जबाबदार; अमित ठाकरेंची फडणवीसांवर टीका