पुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ या पक्षाला निवडणूक आयोगाने काल निवडणूक चिन्ह बहाल केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह खासदार शरद पवार यांच्या गटाला दिले आहे. त्यामुळे आगामी निवडणुका आता शरद पवार गटाला याच ‘तुतारी’ चिन्हाला घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागणार आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या पक्ष चिन्हाचे अनावरण करण्यासाठी शरद पवार गटाकडून किल्ले रायगडावर अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्ष चिन्ह अनावरण सोहळ्याचा ट्रेलरदेखील शरद पवार गटाकडून आता रिलीज करण्यात आला आहे. या पक्ष चिन्हाचा अनावरण सोहळा २४ फेब्रुवारी रोजी किल्ले रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला पक्षाचे प्रमुख शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राज्यातील महत्त्वाचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
घड्याळात वेळ झाली तुतारी फुंकण्याची…!
पक्षचिन्ह अनावरण सोहळा
शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी, २०२४
स्थळ – किल्ले रायगड#तुतारी #पक्षचिन्ह #अनावरण_सोहळा #रायगडकिल्ला@NCPspeaks @PawarSpeaks pic.twitter.com/02l77z6JWL— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 23, 2024
“आता अवघा देश होणार दंग, आदरणीय खासदार शरद पवारसाहेबांच्या साथीने फुंकलं जाणार विकासाचं रणशिंग! ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ पक्षाला मिळालेल्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या पक्ष चिन्हाचा अनावरण सोहळा उद्या दि. 24 फेब्रुवारी 2024 रोजी किल्ले रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे. चला, छत्रपती शिवरायांच्या साथीने तुतारीचा नाद दाही दिशा घुमवूया!”, अशी पोस्ट शरद पवार गटाच्या अधिकृत एक्स हँडलवरून करत पक्ष-चिन्ह अनावरण सोहळ्याचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचे स्पंदन म्हणजे “किल्ले रायगड”…
अन्यायाच्या विरोधात लढण्याची प्रेरणा म्हणजे “किल्ले रायगड”…
दिल्लीश्वरांना महाराष्ट्राचा स्वाभिमान सांगणारी भूमी म्हणजे “किल्ले रायगड”…याच पावन भूमीतून आपण हुकूमशाहीच्या विरोधात संघर्षाचे रणशिंग फुंकत आहोत !#Saheb… pic.twitter.com/KWcGPmS6Oe
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 23, 2024
या व्हिडीओमध्ये ‘घड्याळात वेळ झाली तुतारी फुंकण्याची’ अशा स्वरात सुरवात करण्यात आली आहे. ‘तुतारी स्वभिमानाची, तुतारी शेतकऱ्यांच्या आवाजाची, युवकांच्या उर्जेची, महिलांच्या भरारीची, तुतारी राष्ट्रवादीची’, अशा खासदार अमोल कोल्हे यांच्या आवाजातील हा व्हिडीओ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या सर्व नेत्यांकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिंदे-फडणवीस-पवार २ मार्चला बारामतीत प्रचाराचा नारळ फोडणार!; अनेक विकासकामांचं उद्घाटन
-कात्रजच्या ‘क्वालिटी बेकरीत’ एक्सपायर फुडची विक्री; हिंदुत्ववादी संघटनेकडून बेकरीची तोडफोड
-Pune Drugs Racket: पुणे पोलिसांच्या धडक कारवायानंतर नाशिक पोलीस प्रशासन सज्ज
-पुण्यात इतकं ड्रग्ज सापडतंय याला गृहमंत्रीच जबाबदार; अमित ठाकरेंची फडणवीसांवर टीका
-पैसे परत केले नाही म्हणून शिवीगाळ, मानसिक त्रास; तरुणाने उचललं टोकाचं पाऊल