पुणे : पुणे शहरात देशातील सर्वात मोठे ड्रग्जचे रॅकेटचा खुलासा झाला आहे. पुणे पोलिसांनी पुण्यासह सांगली, दिल्लीत ड्रग्जचे साठे जप्त केले आहेत. पुणे पोलिसांनी आता पर्यंत या प्रकरणी ८ जणांना अटक केली आहे. पुणे पोलिसांनी आतापर्यंत तब्बल ११ हजार किलोंचा साठा पुणे दिल्ली आणि सांगलीतून जप्त केला आहे. या प्रकरणी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असताना भाष्य केले आहे. अमित ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरलं आहे.
पुणे हे विद्येचे माहेरघर राहिले नसून ते ड्रग्जचा उड्डा झाले आहे. यावरुन अमित ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर तोफ डागली. “पुण्यात ड्रग्ज मोठ्या प्रमाणात पकडले गेलं असून हा खूप गंभीर मुद्दा आहे. चार हजार कोटींचे ड्रग्ज पकडले आहे. आम्ही मनसेकडून अवेअरनेस मोहिम सुरु करणार आहोत. एका शहरात एव्हढे ड्रग्ज सापडले आहेत तर, त्याला गृहमंत्री जबाबदार आहेत”, असा गंभीर आरोप अमित ठाकरेंनी यावेळी केला आहे.
अमित ठाकरे यांनी विद्यार्थी-युवकांसह विविध मागण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर धडक मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पैसे परत केले नाही म्हणून शिवीगाळ, मानसिक त्रास; तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
-तुमच्याही नळाला पाणी येत नाहीये???; आता घरबसल्या करता येणार तक्रार
-पुणे ड्रग्ज रॅकेट: दिल्लीत अटक केलेल्या ३ आरोपींना रात्री पुण्याला आणलं
-पुण्यात देशातील सर्वात मोठे ड्रग्ज रॅकेट; सांगलीतून गोव्याला पुरवले जायचे ड्रग्ज