पुणे : पुणे पोलिसांनी काही दिवसांपासून धडक कारवाया करत देशातील सर्वात मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणले आहे. पुणे पोलिसांनी आतापर्यंत ४ हजार कोटी रुपयांचे ड्रग्जचे साठे जप्त केले आहेत. या ड्रग्जचे कनेक्शन सांगली, दिल्ली आणि आता गोव्यातही असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत या प्रकरणाच्या मूळाशी जाण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये दिल्लीमध्ये या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली होती.
ड्रग्स प्रकरणी दिल्लीतून अटक केलेल्या ३ आरोपींना पुण्यात आणलं आहे. दिल्लीत छापीमारी करत पुणे पोलिसांनी ९७० किलो ड्रग्ज जप्त केलं होतं. याच कारवाईत तीन आरोपींना देखील पुणे पोलिसांनी बेड्या ठेकल्या होत्या.
संदीप कुमार, संदीप यादव आणि दिवेश भुतानी अशी या तिघांची नावं आहेत. या तिघांना पुढील तपासासाठी पुणे पोलिसांनी दिल्लीहून रात्री ११ वाजता पुण्यात आणलं आहे. आतापर्यंत पुणे पोलिसांनी या प्रकरणातील ८ आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
हे आरोपी ड्रग्ज राज्यात, देशात आणि देशाबाहेर कुठे कुठे पाठवत होते याबाबतची चौकशी करण्यात येणार आहे. हे आरोपी पंजाबलाही ड्रग्ज पाठवत होते. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचे कनेक्शन हे दुबईमध्येही असल्याची धक्कादायक शंका व्यक्त केली आहे.
दरम्यान, दिल्लीमध्ये पुणे पोलिसांनी ९७० किलोंचा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. आरोपींना पुण्यात आणलं आहे. त्याचबरोबर जप्त केलेला साठा देखील पुण्यात पंचनाम्यासाठी आणण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात देशातील सर्वात मोठे ड्रग्ज रॅकेट; सांगलीतून गोव्याला पुरवले जायचे ड्रग्ज
-नवा पक्ष, नवे चिन्ह, शरद पवार रायगडावर तुतारी वाजवत लोकसभेचे रणशिंग फुंकणार
-“हा नणंद भावजईचा कौटुंबिक कार्यक्रम नाही’; सुप्रिया सुळेंनी घेतली निवडणूक सिरिअसली
-पवार कुटुंबातील कोणीच अजित पवारांचा प्रचार करणार नाही?; जय पवारांची प्रतिक्रिया
-“बैलगाडा शर्यतीचं काम मी केलं अन् क्रेडीट मात्र…, तिकिटासाठी मी पक्ष बदलत फिरत नाही”